Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपले

शेतकर्‍यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान

नागपूर/छ.संभाजीनगर : मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे अनेक जिल

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा  
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.
कन्नड चाळीसगाव औट्राम घाटामध्ये ट्राफिक जाम ; वाहन चालक त्रस्त 

नागपूर/छ.संभाजीनगर : मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे अनेक जिल्ह्यात जलमयपरिस्थिती निर्माण झाली होती. तर अनेकांच्या शेतातील पिके उद्धवस्त झाली होती. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
हिंगोलीत पावसाचा हाहाकार उडवला असून स्कूलबस पाण्यात बुडाल्या आहेत. घरात गुडघाभर पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले आहेत. मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या पुसदमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारची नियोजित जनसन्मान यात्रा रद्द केली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. खराब वातावरण आणि पावसामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना बसला आहे. शनिवाराच्या दुपारपासून कोसळणार्‍या पावसाने अनेक ओढे, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर पुढील काही तास पावसाचा जोर कायम असल्याच्या इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अशातच भंडार्‍यात वीज कोसळून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात दिवसभवर रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. काल रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. अशातच काल रात्री जिल्ह्यातील 53 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. महागावच्या अधरपूस प्रकल्पाचे 10 गेट एक सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 1080 पाण्याचा विसर्ग यातून होत आहे. तर बेंबळा प्रकल्पाचे दहा दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून पाणी पातळी नियंत्रण आणली जात आहे. पुसद येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी डऊठऋ चे एक पथक नागपूरवरून बोलावण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता सर्व  विभाग प्रमुख यांना मुख्यालयीच राहण्याचे निर्देश दिले आहे. या पावसामुळे पुसद तालुक्यातील ईसापुर ते शेंबाळपिंपरी, पुसद ते वाशिम, यवतमाळ ते पुसद, दिग्रस ते पुसद हे रस्ते बंद झाले आहेत

विदर्भ मराठवाड्याच्या संपर्क तुटला – मुसळधार पावसाने महागाव, पुसद तालुक्याला चांगलेच झोडपले असुन नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. या भागात शेतीचे मोठे नुकसानही झाले आहे. या पावसामुळे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील धनोडा येथील पैंनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या संपर्क तुटला आहे. रविवारी सकाळी साडे दहा वाजतापसून पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांना यावरून वाहतूक करू नये, अशा सूचना प्रसासनाकडून देण्यात आल्या आहे.

COMMENTS