Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेतील मुलांनी घेतले जलशुद्धीकरण व अग्निशामनचे धडे

राहाता ः येथील रयत शिक्षण संस्थेचे शारदा कन्या विद्या मंदिर राहाता येथील इयत्ता 5 वी ते 10 वी विद्यार्थी व शिक्षक यांनी गुरूकुल प्रकल्प अंतर्गत र

विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे
बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेला 4 कोटी 72 लाख नफा
वाटेफळला पकडले पावणेदोन कोटीचे बायोडिझेल ; सोळाजणांविरुद्ध गुन्हा दाखल, 11जण जेरबंद

राहाता ः येथील रयत शिक्षण संस्थेचे शारदा कन्या विद्या मंदिर राहाता येथील इयत्ता 5 वी ते 10 वी विद्यार्थी व शिक्षक यांनी गुरूकुल प्रकल्प अंतर्गत राहाता नगरपरिषदेतील जलशुद्धीकरण प्रकल्प पाहणी व अग्निशमन यंञ माहीती होण्यासाठी राहाता नगरपालिकेला भेट देऊन या दोन्हींची कार्य कसे करतात याची माहिती पालिकेचे मुख्य अधिकारी वैभव लोंढे यांच्यावतीने पाणीपुरवठा व अग्निशामन विभागाचे अशोक साठे यांनी विद्यार्थ्यांना दिली. तर यावेळी काय विद्यार्थ्यांनी पाणी कुठून येते ते कसे साठवले जाते साठवलेले पाणी पिण्यास योग्य बनवले जाते व प्रत्येकाला घरात कसे वाटप केले जातील याची माहिती जाणून घेतली.
आग लागल्यास कोणती खबरदारी घ्यावी तसेच आग लागलेल्या ठिकाणी कसे जाऊन आग नियंत्रणात येईल याची माहिती जाणून घेतली. शहरात कातनाला साठवण तलावातील पाणी फिल्टर हाऊस येथे मोटारपंपाद्वारे नेऊन ब्लीचींग पावडर व लम (तुरटी) टाकुन जलशुद्धीकरण केले जाते व नंतर नळाद्वारे पाणी शहरात वितरण केले जाते. याबाबत सर्व माहीती पाणीपुरवठा व अग्निशमन विभागाचे अशोक साठे यांनी दिली तर जलशुद्धीकरण चे प्रात्यक्षिक संदीप शिंदे व विठ्ठल बनकर यांनी दाखविले. तसेच अग्निशमन वाहन, फायर रॅपिड बुलेट, व इतर साहीत्य माहीती व आग लागल्यास आटोक्यात आणणेकामी प्राथमिक ऊपाय करणे, याचे सर्व प्रात्यक्षिक अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांनी दिले. यावेळी शारदा कन्या विद्दा मंदिरचे शिक्षक, शिक्षिका, नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब शिरसाठ, जोगदंडकर, पाटील, व सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व आभार रविंद्र बोठे यांनी मानले.

COMMENTS