Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणोरे-संगमनेर, गणोरे-अकोले बस फेर्‍या नियमित सुरू करा

ग्रामस्थांची मागणी ; बसअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

अकोले ः सध्या विविध महाविद्यालयांचे प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थिनींनी संगमनेर व अकोले या ठिकाण

मुर्शतपूर शिवारात आढळले बिबट्याचे बछडे
कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात
श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार

अकोले ः सध्या विविध महाविद्यालयांचे प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थिनींनी संगमनेर व अकोले या ठिकाणी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने मुलींची संख्या मोठी असून गणोरे व पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर मुली उच्च शिक्षणाकरता संगमनेर, अकोले येथे जातात, परंतु सध्या गणोरे-अकोले, गणोरे-संगमनेर या मार्गावरील बस सध्या बंद आहेत. किंवा अत्यल्प प्रमाणात सुरू आहे.
सदर भागात बसेसच्या फेर्‍या वाढविण्यात याव्यात. सध्या राज्यांमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेचे मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील अनेक मुली या शिक्षणाकरता संगमनेर, अकोले या ठिकाणी जात असतात. बस वेळेवर नसल्याने मुलींना व महिलांना ग्रामीण भागात प्रवास करण्यास बस अभावी अनेक प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही प्रश्‍न निर्माण होऊ शकतात.,म्हणून संगमनेर व अकोले या दोन्ही बस स्थानकातून गणोरे या ठिकाणी बसेसच्या फेर्‍या राज्य महामंडळाकडून वाढवण्यात यावेत.अशी आग्रही मागणी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष शुभम आंबरे, सुशांत आरोटे,गणोरे ग्रामपंचायतचे सदस्य विवेक आंबरे, पोपट आहेर, रावसाहेब आहेर, राजेंद्र वालझाडे, धनजय आहेर, प्रवीण आहेर, सोमनाथ आहेर, दत्तात्रय आहेर, गणेश आंबरे, सचिन आंबरे, मा.उपसरपंच राजेंद्र आंबरेतसेच ग्रामस्थ गणोरे व पंचक्रोशीतील  महिला व मुलींनी केली आहे. राज्य परिवहन महामंडळ अकोले आगार व संगमनेर आगार यांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन या मार्गावरील बसेसच्या फेर्‍या वाढवाव्यात.अशी आग्रही मागणी केली आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

सध्या गणोरे व  गणोरे पंचक्रोशीतील अनेक मुलींनी  उच्च शिक्षणाकरिता संगमनेर, अकोले या ठिकाणी प्रवेश घेतलेले आहेत. या मार्गावर मुलींना व महिलांना प्रवास करताना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. म्हणून अकोले आगार व संगमनेर आगारातून गणोरे या ठिकाणी राज्य महामंडळाच्या बस च्या फेर्‍या नियमित वाढवाव्यात. अन्यथा येथील महिला,मुली,ग्रामस्थ आंदोलन करतील.
शुभम किसन आंबरे, (सामाजिक कार्यकर्ते, गणोरे)

COMMENTS