Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जखमी गोविंदांना मिळणार तात्काळ वैद्यकीय मदत !

मुंबई : आज सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जात आहे. वेगवेगळी गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्यास सज्ज झाली आहेत. मात्र, याच दह

केडगाव महामार्गावर अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू
ट्रकने दिलेल्या धडकेत शिवभक्ताचा मृत्यू
आकांक्षा कुंभार स्टार डायमंड इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये विजेती

मुंबई : आज सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जात आहे. वेगवेगळी गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्यास सज्ज झाली आहेत. मात्र, याच दहीहंडीच्या उत्सवात काही वेळेस उंच थरांवरुन पडून गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते. या कारणामुळे गेल्या काही वर्षांत गोविंदा जखमी होऊन मरण पावल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. अशा दुर्घटना होऊ नयेत याकरता एक हेल्पलाऊन क्रमांक देण्यात आला आहे. जखमी गोविंदांसाठी या क्रमांकावर संपर्क साधल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाने जखमी गोविंदांसाठी इमर्जेंसी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. यासाठी कोणत्याही गोविंदाला ऑर्थोपेडिक किंवा मेंदूला दुखापत झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका सेवासाठी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर 7506274959 वर कॉल करण्याचे आवाहन एम्सने केले आहे.

COMMENTS