Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटणकर विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश

तब्बल सतरा खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड

अकोले ः क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच तालुका क्रीडा समिती अकोले यांचे संयुक्त व

प्रशासकांना बँक वाचवायची नाही ; नगर अर्बन बचाव कृती समितीचा आरोप, दालनात झाली हमरीतुमरी
स्वामीराज कुलथे यांना राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार घोषित
Ahmednagar : नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Video)

अकोले ः क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच तालुका क्रीडा समिती अकोले यांचे संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालय राजूर येथील कुस्ती संकुलनात संपन्न झाल्या.
या स्पर्धांमध्ये सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.तब्बल सतरा खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. यामध्ये 14 वर्षे वयोगटातील फ्रीस्टाईल प्रकारात 35 किलो वजनगटात भांगरे ईश्‍वर काळू प्रथम तर देशमुख रविंद्र करण याने द्वितीय क्रमांक मिळविला.38किलो वजनगटात बोर्‍हाडे प्रणव गणेश व 48 किलो वजनगटात नागरे साई मारूती यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 17 वर्षे वयोगटात फ्रीस्टाईल प्रकारात 41 त े45 किलो वजनगटात बोर्‍हाडे जयेश गणेश, 48 किलो वजनगटात मुर्तडक सुरज संजय, 65 किलो वजनगटात फडतरे संग्राम नवनाथ, 71 किलो वजनगटात शेंडगे भैरवनाथ सुनिल, 80किलो वजनगटात ढोकणे सार्थक ज्ञानदेव, 43 किलो वजनगटात जाधव ईश्‍वरी पोपट यांनी प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळविला आहे. 17 वर्षे वयोगटात ग्रीकोरोमन प्रकारात 41 ते 45 किलो वजनगटात लोहरे निलेश गणपत, 48 किलो वजनगटात देशमुख अधिराज राधाकिसन, 51 किलो वजनगटात सदगीर सार्थक बाळू यांनी प्रथम क्रमांक मिळविला. 19 वर्षे वयोगटात फ्रीस्टाईल प्रकारात 61 किलो वजनगटात रावते तेजस सुरेश प्रथम, 57 किलो वजनगटात पोरे दीपक नवसू याने द्वितीय क्रमांक मिळविला. ग्रीकोरोमन प्रकारात 55 किलो वजनगटात दातखिळे प्रतिक एकनाथ व 53 किलो वजनगटात दातखिळे सानिका सचिन यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच तान्हाजी नरके,क्रीडाशिक्षक जालिंदर आरोटे, विनोद तारू यांचे मार्गदर्शन लाभले.या नेत्रदीपक यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहरराव देशमुख, सचिव एम.एल. मुठे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन, सर्व संचालक, प्राचार्य बादशहा ताजणे, पर्यवेक्षक सदाशीव गिरी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.

COMMENTS