Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज

छ.संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

औरंगाबाद जिल्ह्याकडे पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दरवर्षीप्रमाणे सोयगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांसोबत केली होळी-रंगपंचमी 
करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 

छ.संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. मात्र राडा होण्यापूर्वीच पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज देखील करावा लागला. या सर्व प्रकरणामुळे संभाजीनगर मधील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.
आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर हा सर्व प्रकार घडला. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्या प्रकरणातवर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार घडला. दिशा सालियन प्रकरणांमध्ये ज्याप्रकारे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सत्तेत असताना कारवाई थांबवली होती. या विषयावर आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत. आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये थांबले असल्याचे आम्हाला कळाले होते. त्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकारी येथे आल्या आहेत. दिशा सालियन यांच्या मर्डर केसचे काय झाले? याचा जाब आम्ही विचारणार असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या वेळी म्हटले आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे हॉटेल रामामध्ये मुक्कामी होते. भाजपच्या वतीने या ठिकाणी दिशा सालियान प्रकरणात निषेध आंदोलन करण्यात आले. तर शिवसेनेच्या वतीने देखील भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. एकाच वेळेस सेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार्‍यांवर अशा पद्धतीने लाठीचार्ज होणे ही गुंडशाही आहे. हे खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

COMMENTS