Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू ह्र्दयविकारा मुळेच  

आई-मुलाच्या मारहाणीतून मृत्यू; राहुरी पोलिसात गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा ः राहुरी येथील शनी शिंगणापूर फाटा येथे 22 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान माय-लेकाकडून झालेल्या मारहाणीत सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त

Ahmednagar : सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय कामासंदर्भात अडचण भासू देणार नाही l LokNews24
भाजप का करतेय विखे पिता पुत्रांच्या आर्थिक घोटाळ्याकडे दुर्लक्ष ?
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड

देवळाली प्रवरा ः राहुरी येथील शनी शिंगणापूर फाटा येथे 22 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान माय-लेकाकडून झालेल्या मारहाणीत सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याबाबत आई व मुलावर गर्जे यांच्या मृत्यूस धरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील मयत सुखदेव किसनराव गर्जे, वय 68 वर्षे, रा. खंडोबा नगर, शेवगाव, यांचे आरोपी सोबत पूर्वीचे वाद सुरु होते. पाथर्डी पोलिस ठाण्यात 307 चा गुन्हा दाखल आहे. याचा राग आरोपीच्या मनामध्ये होता. 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान मयत सुखदेव गर्जे हे कामा निमित्त राहुरी येथे आले होते. राहुरी शहरातील शनि शिंगणापूर फाटा येथे आरोपी माय लेकाने सुखदेव गर्जे यांना शिवीगाळ करुन हेल्मेटने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सुखदेव गर्जे यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांची यापुर्वी जोप्लास्टी झालेली आहे. असे आरोपींना माहीत असून देखील त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण होत असताना सुखदेव गर्जे हे जागेवर बेशुद्ध पडले होते. त्यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारा पुर्वीच मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, राजेंद्र नागरगोजे, संदिप ठाणगे, गोवर्धन कदम, महिला पोलिस कर्मचारी कुसळकर आदि पोलिस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलिस पथकाने ताबडतोब एक महिला व तीच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर सुखदेव गर्जे यांच्यावर अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून सुखदेव गर्जे यांचा मृत्यू -हदय विकाराच्या तिव्र झटका आल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच सुखदेव गर्जे यांना -हदय विकाराचा तिव्र झटका येवुन त्यांचा मृत्यू झाला. किशोर सुखदेव गर्जे, वय 34 वर्षे, रा. खंडोबा नगर, शेवगाव, यांच्या फिर्यादीवरून आरोपी सावित्री उर्फ शोभा विष्णु फुंदे व तीचा मुलगा वैभव विष्णु फुंदे, दोघे रा. राहुरी कृषी विदयापीठ, ता. राहुरी. या माय लेकावर गुन्हा रजि. नं. 948/2024 भारतीय न्याय संहीता कलम 105, 118 (1), 115 (2), 352, 351 (2) (3), 3 (5) प्रमाणे सुखदेव किसनराव गर्जे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक परदेशी हे करीत आहे.

COMMENTS