जळगाव ः जळगाव : नेपाळ येथील बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृत पडलेल्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प
जळगाव ः जळगाव : नेपाळ येथील बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृत पडलेल्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जळगाव येथे आयोजित लखपती दीदी या कार्यक्रमात बोलत होते.
जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी या योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल तसेच या भागातील 80 भविकांचा समूह देवदर्शनासाठी गेले होते. नेपाळ येथे शुक्रवारी भाविकांच्या एका बसला भीषण अपघात झाला, या अपघातात जिल्ह्यातील 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक तरुण नदीच्या पाण्यात वाहून गेला आहे. या तरुणाचा शोध घेणे सुरू आहे. या अपघातात काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या बस अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत केंद्र सरकारतर्फे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपायांची मदत जाहीर केली आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मृत व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला आहे.
COMMENTS