Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

  मुंबई- शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसेची विधानसभेसाठी स्वबळावर लढण्याची तयारी ?
राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द
पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरे आक्रमक

  मुंबई– शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर, अमरावती आणि वाशिममध्ये जाणार आहेत. नागपूरमध्ये राज ठाकरेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात, फटाके फोडत राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. आज रवीभवन इथे राज ठाकरे मनसे पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. 

पुरोगामी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरु आहे.जातीयवाद, फोडाफोडी राजकारण सुरु आहे. सगळ्याला शरद पवार जबाबदार आहेत.जातीवादाचे राजकारण पवारांनी सुरु केले. राष्ट्रवादीजन्मानंतर 1990 नंतर ते सुरु झाले. राजकारणापर्यंत मर्यादित न रहाता हा विषय घरा घरात घुसलाय असे ते म्हणाले.  राजकारणाचा सध्या चिखल झालाय. गणेश नाईक, नारायण राणे गेले त्याला शरद पवार कारणीभूत आहेत. मी सर्व मतदारसंघात उमेदवार देणार, असे राज ठाकरे म्हणाले.

COMMENTS