Homeताज्या बातम्याविदेश

महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमध्ये बस नदीत कोसळून दुर्घटना

काठमांडू ः पर्यटनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांच बस अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील तानाहून जिल्ह्यात शुक्रवारी बस नदी

पुंछ सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटी यांची छोटी बहिण अमीना यांचे निधन

काठमांडू ः पर्यटनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांच बस अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील तानाहून जिल्ह्यात शुक्रवारी बस नदीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला आहे. सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले आहे. या बसमध्ये एकूण 40 ते 41 प्रवासी होते, यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात महाराष्ट्रातील एक प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी माहिती दिली की, यूपी एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. नेपाळमधील अपघाताबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला तासाभरापूर्वी ही घटना समजली आहे. मी संबंधित गावाचे जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबतही यासंदर्भात चर्चा केली. नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाल्याची माहिती मिळात आहे. 41 भाविक बसमध्ये होते. त्यातील 14 जण ठार झाले आहेत. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आताच सर्व गोष्टी जाहीर करणे शक्य नाही. पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणांसोबत आम्ही संपर्कात असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे. घटनास्थळी सशस्त्र पोलीस दलाच्या (एपीएफ) 45 कर्मचार्‍यांचे पथक उपस्थित आहे. 23व्या बटालियनचे सुमारे 35 एपीएफ जवान बचावकार्य करत आहेत. नेपाळ लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर काठमांडूहून वैद्यकीय पथकाला घेऊन तनहुनकडे रवाना झाले आहे.

COMMENTS