Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर बंद

संगमनेर ः बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवार 24 ऑगस्ट 2024 रोजी संगमनेर शहर व तालुक्या

श्रीगोंद्यात 832 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
कर्जतमध्ये टेम्पो अंगावर घालून जावयाचा खून
राष्ट्रीय महामार्गाचे नियम शिथील करुन रस्त्याची दुरुस्ती व्हावी नगरसेविका सुवर्णा जाधव यांची मागणी

संगमनेर ः बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवार 24 ऑगस्ट 2024 रोजी संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार असून आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आवाहन संगमनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली असून या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.
पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे घडली. या घटनेचे संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून राज्यभरातून या घटनेचा निषेध होत आहे. खरे तर महिला शक्ती ही देशाची ताकद आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. अनेक मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांमध्ये घबराट आहे. आरोपींना कोणतीही जरब नाही. कायदा सुव्यवस्था ढासाळली आहे. अल्पवयीन शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या बदलापूर घटनेतील नराधम आरोपींना कोणतेही राजकीय संरक्षण न देता तातडीने फाशी द्यावी अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत संगमनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष, सर्व पुरोगामी संघटना, मित्रपक्ष आरपीआय व इतर समविचारी पक्षांनी या बंदला संपूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून शनिवारी आठवडी बाजार सह संपूर्ण शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. तरी बदलापूर येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने दिलेल्या बंदच्या हाकेला सर्व नागरिक, महिला, तरुण, व्यापारी, शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रतिसाद घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी व संगमनेर तालुक्यातील विविध महिला व नागरिक संघटनांच्या वतीने वतीने करण्यात आले आहे. 

COMMENTS