Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेखर वाकचौरे टायकून अँवार्ड 2024 ने सन्मान

बेलापूर ः सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करणारे युवा शेतकरी ते एक यशस्वी व्यवसायीक असा प्रवास करणारे  शेखर वाकचौरे यांना ग्लोबल इंडिया या संस्थे

डॉ. पोखरणा यांच्या जामिनावर 23 नोव्हेंबरला होणार सुनावणी
शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सुटण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन
LokNews24 l फोन टॅपिंगच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव

बेलापूर ः सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करणारे युवा शेतकरी ते एक यशस्वी व्यवसायीक असा प्रवास करणारे  शेखर वाकचौरे यांना ग्लोबल इंडिया या संस्थेच्या वतीने दिल्या जाणार्‍या महाराष्ट्र बिझनेसचा टायकून अँवार्ड 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेतकरी असणारे शेखर रमेशराव वाकचौरे हे गेल्या 10 वर्षापासुन साँईल चार्जर टेक्नाँलाँजी वैदिक या मिशन सोबत काम करत आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षात अनेक शेतकर्‍यांना रासायनिक शेतीपासुन परावृत्त करुन सेंद्रिय शेतीकडे वळविले आहे. शेतकर्‍यांना शाश्‍वत व समृद्ध शेतीचा मूलमंत्र देत रासायनिकच्या अति वापरामुळे नापीक होत चाललेली शेत जमीन सुपीक करण्याचे काम वाकचौरे यांनी केले आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी सेंद्रिय शेती पिकवुन समाजाला विष विरहीत फळे भाजीपाला देत आहे. सेंद्रिय शेतीतुनतयार केलेले भाजीपाला फळे यांना बाजरपेठे चांगली मागणी आहे रासायनीक खते रासायनिक औषधाची फवारणी करुन तयार झालेले पिक हे विष असल्याचे मत शेखर वाकचौरे यांचे आहे. आपल्याला होणारे आजार हे केवळ पाणी व खात असलेले अन्न यातुनच होते त्यामुळे शेती पिकवीताना आपण अन्नदाता आहोत याचे भान ठेवुन सेंद्रिय शेती करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांचे मत आहे.त्यांनी सुरु केलेल्या कार्याची दखल ग्लोबल इंडिया पुणे या संस्थेने घेतली असुन उदयोन्मुख व्यवसायीक हा पुरस्कार त्यांना नुकताच मराठी सिने आभिनेत्री श्रृती मराठे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले आहे. 

COMMENTS