Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका

आ. आशुतोष काळे यांचे सेन्ट्रल बँकेच्या अधिकार्‍यांना पत्र

कोपरगाव : महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे काही बँका परस्पर कर्ज खात्यात जमा करीत असल्याच्या

सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे
आद्यपुरुष एकलव्यांच्या स्मारकासाठी निधी द्या
येवलाच्या व्यापार वृद्धीसाठी गौतम बँकेची मदत होईल
लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका आ. आशुतोष काळेंचे सेन्ट्रल  बँकेच्या अधिकाऱ्यांना पत्र!! - Kopargaon24tasnews

कोपरगाव : महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे काही बँका परस्पर कर्ज खात्यात जमा करीत असल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नये अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी सेन्ट्रल बँकेच्या (लिड बँक) अधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, महायुती शासनाने राज्यातील माता भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘माझी लाडकी बहिण’ योजना सुरु केली असून या योजनेचे राज्यातील तमाम माता भगिनींनी स्वागत करून महायुती शासनाचे आभार मानले आहे. जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने 10 ऑगस्ट रोजी कोपरगाव दौर्‍यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी या योजनेच्या सहा हजार कोटीच्या फाईलवर सही करून आलो असल्याचे सांगत रक्षाबंधनाच्या अगोदर माता भगिनींच्या खात्यात रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज भरणार्‍या मतदार संघातील बहुतांश माता भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा देखील झाले त्यामुळे माता भगिनींचे हे रक्षाबंधन अतिशय आनंदात गेले. परंतु काहीं बँकांनी मात्र या माता भगिनींचे आलेली तीन हजार रुपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली असल्यामुळे या माता-भगिनींना पैसे मिळाले नसल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.माता-भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती शासनाने हि योजना सुरु केलेली आहे. परंतु बहुसंख्य महिला बचत गटाच्या सदस्य असल्यामुळे त्यांच्या बचत गटाचे कर्ज खाते तसेच काही महिलांचे देखील वैयक्तिक कर्ज खाते असल्यामुळे हे पैसे कर्ज खात्यात जमा केले जात आहे. त्यामुळे जर महिलांचे पैसे बँकांनी कर्ज खात्यात जमा केल्यास महिलांच्या आर्थिक अडचणी जैसे थे राहणार आहेत. त्यामुळे ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचे पैसे कर्ज खात्यात जमा न करता माता भगिनींच्या बचत खात्यात जमा करण्याच्या सूचना बँकांना देवून आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना दिलासा द्यावा असे आ. आशुतोष काळे यांनी सेन्ट्रल बँकेच्या (लिड बँक) अधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात शेवटी म्हटले आहे.

COMMENTS