Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विभागीय यशवंत पंचायतराज अभियान समितीची जिल्हा परिषदेस भेट

जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांचे कार्यमुल्यमापन

नाशिक : "यशवंत पंचायत राज अभियान सन २०२३-२४ राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व पंचायतींसाठी पुरस्कार योजनेंतर्गत सन २०२२-२३ म

आजचे राशीचक्र मंगळवार,२१ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
ट्रॅव्हल्स ने घेतला अचानक पेट….| LOKNews24
कोर्टाच्या निर्णयावर भुजबळांनी केला मोठा आरोप | LOKNews24

नाशिक : “यशवंत पंचायत राज अभियान सन २०२३-२४ राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व पंचायतींसाठी पुरस्कार योजनेंतर्गत सन २०२२-२३ मध्ये केलेल्या कामगिरीचा मुल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी विभागस्तरीय क्षेत्रिय समितीने आज नाशिक जिल्हा परिषदेस भेट दिली. या द्विसदस्यीय समितीमध्ये धुळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांचा समावेश असून या समितीने जिल्हा परिषद नाशिक येथे भेट देत यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांचे कार्य मूल्यमापन या द्विसदस्यीय समितीकडून करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभाग स्तरावर पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या त्याविभागातील फक्त एकच पंचायत समिती आणि विभागातून प्रथम आलेली एकच जिल्हा परिषद राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

COMMENTS