Homeताज्या बातम्यादेश

 एससी-एसटी आरक्षणातील क्रीमिलेयर विरोधात

देशभर भारत बंदची हाक देत विविध संघटनांचे आंदोलन

नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अर्थात एससी आणि अनुसूचित जमाती अर्थात एसटी आरक्षणात क्रीमिलेयर लागू करण्याच्या विरोधात बुधवारी वि

स्वतंत्र भारत पक्षाने दिले सिंग, पवार व भुसेंना धन्यवाद ; कांदा खरेदी निर्णयाबद्दल कृतज्ञता
हलगर्जीपणाचे बळी
पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांना विविध कलमान्वये शिक्षा 

नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अर्थात एससी आणि अनुसूचित जमाती अर्थात एसटी आरक्षणात क्रीमिलेयर लागू करण्याच्या विरोधात बुधवारी विविध दलित-आदिवासी संघटनांनी भारत बंदची हाक देत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशनने याला दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात म्हटले आहे.
भारत बंदचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. काँग्रेस, टीएमसी, सपा, बसपा, आरजेडी, जेएमएमसह अनेक पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. अनुसूचित जाती आरक्षणात क्रिमी लेयर लागू होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद0 मोदी यांनी 9 ऑगस्ट रोजी सांगितले होते. 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी टिप्पणी केली होती की, एससी-एसटीमध्ये क्रीमिलेयर लागू करण्याचाही विचार केला पाहिजे. दलित खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर विविध संघटनांनी बुधवारी भारत बंदची घोषणा देत देशभर आंदोलने केली. यावेळी बिहार राज्यातील पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यावेळी उपजिल्हाधिकार्‍यांसह पोलिस व इतर पोलिस फोर्स रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, यावेळी, पोलीस फोर्समधील एका पोलिसाने चक्क उपजिल्हाधिकार्‍यावरच लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. देशातील उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यात भारत बंदचे पडसाद उमटले आहेत. दलित संघटनांनी रस्त्यावर उतरत भारत बंदसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण – सर्वोच्च न्यायालयाच्या एससी आरक्षणात क्रिमी लेयर लागू करण्याच्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी बुधवारी  भारत बंदची हाक दिली आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये भारत बंदचा परिणाम दिसू लागला आहे. बंद समर्थकांनी सकाळी 9 वाजल्यापासून रांची शहरी भाग तसेच रिंगरोड परिसरात उतरून रस्ते अडवले. तर याठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली आहे. या भारत बंदमध्ये सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला,

उपजिल्हाधिकार्‍यावरच लाठीचार्ज – बिहारमधील काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिकार्‍यांवरच लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसावर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटीझन्स पोलिसांना ट्रोल करत आहेत. 

COMMENTS