Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

पाच जण होरपळले, ससूनमध्ये भरती

पुणे :  पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घरगुती गॅसचा स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना पिंपरीच्या

आता गॅस सिलेंडरवर मर्यादा ; वर्षभरात केवळ 15 गॅस सिलेंडर मिळणार
पुजेसाठी अगरबत्ती पेटवली असता गॅस सिलेंडर झाला स्फोट.
अकोले तालुक्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक

पुणे :  पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घरगुती गॅसचा स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना पिंपरीच्या बौद्ध नगरमध्ये घडली आहे. होरपळलेल्या पाच ही रुग्णांना आधी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गॅस स्फोटानंतर आग न लागल्याने स्थानिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कल्पना दिलीच नाही. आता हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधले जात आहे. गॅस स्फोटमध्ये जखमी झालेल्यांमध्ये  मनोज कुमार वय 19, धीरज कुमार वय 23, गोविंद राम वय 28, राम चेलाराम वय 40, सत्येंदर राम वय 30 यांचा समावेश आहे. हा भीषण स्फोट गॅस पाईप लिक झाल्याने असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

COMMENTS