Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अत्याचार करणार्‍यांना प्रतिकार करण्याचे सामर्थ्य अंगीकारा

महंत रामगिरी महाराज यांचे आवाहन संतोषी माता मंदिरातील सप्ताह सोहळ्याची सांगता

श्रीरामपूर ः हिंदू धर्म जगाच्या पाठीवर सर्वाधिक सहिष्णु व शांतताप्रिय नक्कीच आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन कोणी अन्याय करीत असेल त्याला प्रसंगा

तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त l DAINIK LOKMNTHAN
मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादी कचराप्रश्‍नी आंदोलन पवित्र्यात
अत्याचार करणार्‍या नराधमांवर कठोर कारवाई करा

श्रीरामपूर ः हिंदू धर्म जगाच्या पाठीवर सर्वाधिक सहिष्णु व शांतताप्रिय नक्कीच आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन कोणी अन्याय करीत असेल त्याला प्रसंगानुरूप प्रतिकार करण्याचे सामर्थ्यही अंगिकारण्याची गरज आहे असे प्रतिपादन सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी आज केले. बेलापूर येथील जय संतोषी माता प्रतिष्ठानच्या वतीने  संतोषी माता जन्मोत्सवा निमित्त आयोजित 45 व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याच्या समाप्ती प्रसंगी काल्याच्या किर्तनात महंत रामगिरी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ठेच लागण्याची वाट न पाहता त्याआधीच सर्वांनी जागे राहिले पाहिजे. संकट मोचक मारुती राया जय कपिस लोक उजागराचा जागर करुन सर्वांना जागृत ठेवतात. देश विदेशातील काही हिंदुंविरोधी घटनांमुळे तरुणांमध्ये जागृती निर्माण झाली ही अभिमानाची बाब असुन ही जागृती अशीच टिकवुन ठेवा. सहिष्णू व शांत राहुन जर कोणी अत्याचार करीत असेल तरीही निमूटपणे ते सहन करा हे सांगणारी अहिंसा काय कामाची? असा सवाल करीत त्यांनी अन्यायाविरोधात प्रतिकार केला पाहिजे.प्रत्येकाने आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा आणि आपल्या आदर्श संस्कृतीचा अभिमान बाळगून ती अधिक समृध्द करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. स्व. बाळासाहेब ठोंबरे व श्रीमती हिराबाई ठोंबरे परिवाराने सुरु केलेल्या या अध्यात्मिक सोहळ्यातुन धर्म जागरण व एकसंघ समाज निर्मितीला हातभार लागत आहे. त्यांच्या पश्‍चात सर्वश्री राजेंद्र ठोंबरे, सचिन ठोंबरे, सुनील ठोंबरे यांच्या नव्या पिढीनेही हा वारसा समृध्दपणे जपला आहे. त्याबद्दल महंत रामगिरी त्यांनी समाधान व्यक्त केले. मातोश्री हिराबाई ठोंबरे यांनी रामगिरी यांचे औक्षण केले तर राजेंद्र ठोंबरे यांनी त्यांचे पूजन केले. यावेळी सर्वश्री मधु महाराज, दत्तात्रय बहिरट, किरण गायधने, राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग, अध्यात्मिक आघाडीचे बबनराव मुठे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने स्त्री पुरुष भाविक उपस्थित होते. महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता झाली. सूत्रसंचलन प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले. प्रारंभी श्रीरामपूर येथील थत्ते मैदान ते बेलापूर अशी भव्य रॅली काढून रामगिरी यांचे उत्साह, जल्लोष आणि भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS