Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा परिसरातील बंधारे व पाझर तलाव ओव्हरफलोच्या पाण्याने भरून द्यावे ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा परिसरातील दहा गावांत चालु पावसाळी हंगामात पुरेशा प्रमाणांत पाउस झालेला नाही तेंव्हा गोदा

डेंग्यूच्या साथीने कोपरगावकर त्रस्त, उपाययोजना करा ः विवेक कोल्हे
कर्मवीरांची स्वावलंबनाची शिकवण काळाची गरज ः विवेक कोल्हे
व्यवस्थेच्या निष्काळजीपनाचे निष्पाप नागरिक बळी ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा परिसरातील दहा गावांत चालु पावसाळी हंगामात पुरेशा प्रमाणांत पाउस झालेला नाही तेंव्हा गोदावरी उजव्या कालव्यास सध्या ओव्हरफलोच्या पाण्यांचे आर्वतन सुरू असून चांगदेवनगर, जळगांव, रामपुरवाडी येथील पाझर तलाव, दगडी साठवण बंधारे व पुणतांबा येथील गणेश बंधारा तात्काळ पाण्यांने भरून द्यावा अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
             त्यांनी पुढे म्हटले आहे की, चालु पावसाळी हंगामात अद्यापही पुरेशा प्रमाणांत पाउस झालेला नाही. पुणतांबा परिसरातील चारी कमांक 17,18 व 19 अंतर्गत असलेले दगडी साठवण, बंधारे, पाझर तलाव व गणेश बंधारे गोदावरी उजव्या कालव्याच्या ओव्हरफलोच्या पाण्यांतुन भरून मिळावे म्हणून त्या भागातील शेतकरी व रहिवासी नागरिकांनी केलेली आहे. पाउस नसल्यांने परिसरातील विहीरींना पाणी नाही त्यामुळे नागरिकांसह, जनावरांचे सध्या पिण्यांचे पाण्यांचे प्रचंड हाल होत आहे. सध्या गोदावरी उजव्या कालव्यास पाण्यांचे आर्वतन सुरू आहे. पुणतांबा परिसरातील काही बंधारे आपल्या मागणीप्रमाणे भरून दिले मात्र चांगदेवनगर, जळगांव, रामपुरवाडी येथील दगडी साठवण बंधारे पाझर तलाव व पुणतांबा येथील गणेश बंधारा अद्यापही कोरडा आहे तेंव्हा ते तातडीने पाण्यांने भरून द्यावे म्हणजे त्याचा फायदा या परिसरातील रहिवासी नागरिकांसह पशुधन वाचविण्यासाठी होईल.

COMMENTS