Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ससूनमधील रक्त बदल प्रकरणात आणखी दोघांना अटक

पुणे ः पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर  ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघा

बहिणीला सासरी सोडायला आलेला भाऊ जिवंत घरी परतलाच नाही 
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ  एका उमेदवाराची निवडणुकीत माघार
ट्रिपल मर्डर ! घरात आईचा खून तर दोन मुलांना विहिरीत ढकललं| LOK News 24

पुणे ः पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर  ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी दोघांची नावे आहेत. अल्पवयीन कारचालकासोबतच आणखी दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताची अदलाबदल करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शेने दोघांना चिरडले होते. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्‍विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. याप्रकरणी आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना देखील अटक झाली. यानंतर याप्रकरणी मोठी चर्चा सुरू झाली होती.

COMMENTS