Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्पर्धात्मक भाव मुलांचे भविष्य घडवतो ः प्रफुल्ल खपके

श्रीरामपूर ः दवणगाव येथील उपक्रमशील असणारे युवक प्रफुल्ल खपके त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवनगाव व गणेशवाडी येथे हस्ताक्

सासरच्या छळाला कंटाळून कर्जतमध्ये विवाहितेची आत्महत्या
व्हिडिओ काढत असल्याचा संशयावरून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून 
संजय गांधी निराधार योजनेच्या 637 पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मान्यता – आ.आशुतोष काळे

श्रीरामपूर ः दवणगाव येथील उपक्रमशील असणारे युवक प्रफुल्ल खपके त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवनगाव व गणेशवाडी येथे हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्फुर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील शालेय मुलांना उपक्रमशील बनविणे तसेच  त्यांच्यातील स्पर्धात्मक दृष्टिकोनाला, अंगभूत कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत सुदर्शन मोहटे, तनवी साळुंके (पहिली), विराट कुटे, आराध्या पाळंदे (दुसरी), अथर्व कासार, प्रांजल साळुंखे (तिसरी), ईश्‍वर पाडांगळे, प्रांजल मोहटे, कार्तिक खपके व आकांक्षा दाभाडे (चौथी) यांनी बक्षिसे मिळविली. सदरप्रसगी गावचे सरपंच, सदस्य, व्यवस्थापन समिती तसेच मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा विजेत्यांना स्मृतीचिन्ह तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.                                                 खपके यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभेट म्हणून आलेले शालेय शैक्षणिक साहित्य रक्षा बंधनाचे औचित्य साधून निराधार व गरजू भगिनींमध्ये वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS