Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा

वन नेशन वन इलेक्शनवरून खा. शरद पवारांचे थेट आव्हान

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा केली होती, मात्र सरकारला चार राज्यात एकत्र निवडणुका घेता नाही,

आरक्षण प्रश्‍नावर सर्वपक्षीय बैठक बोलवा
महायुतीचे अन्यायी सरकार खाली खेचा
…तर, महाराष्ट्रातही मणिपुरसारखे घडेल

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा केली होती, मात्र सरकारला चार राज्यात एकत्र निवडणुका घेता नाही, त्यामुळे देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. त्यांनी म्हटल्याप्रमाणे 4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान खासदार शरद पवार यांनी मोदी सरकारला केले आहे. विदर्भ दौर्‍यावर असतांना खा. पवार यांनी मोदी सरकारला हाटोला लगावला आहे.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना संबंध देशाच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी भूमिका मांडली. ती भूमिका मांडून 12 तास होत नाहीत, तोवरच चार राज्यांची निवडणूक वेगवेगळी जाहीर झाल्याचे पाहायला मिळाले. संबंध देशाची निवडणूक एकत्र घेण्याची भूमिका मांडत असताना त्यांनी झारखंड व महाराष्ट्रात निवडणूक जाहीर केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणात विसंगती दिसत आहे, एवढेच याप्रसंगी बोलू शकतो, असा टोला पवार यांनी लगावला. महाराष्ट्र राज्यातील परिस्थितीवर भाष्य करतांना ते म्हणाले की, शासनाचे धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचे जास्त महत्त्व वाटते. म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल, याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणार्‍या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल, असे काही करू नये हे माझे आवाहन आहे, असे पवारांनी म्हटले आहे. बांग्लादेशमधील हिंसाचार आणि त्याचे भारत आणि विशेषत: महाराष्ट्रावर होत असलेल्या परिणामांवर शरद पवारांनी भाष्य केले आहे. पश्‍चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशला लागून आहेत. पण तिथे काही घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रात परिणाम पाहायला मिळतील, असे कधी घडले नाही. या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण देशात सामंजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे. पश्‍चिम बंगालमधील कोलकात्यात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या सगळ्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

COMMENTS