Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंजूर बंधारा दुर्घटनेतील मयत संतोष तांगतोडे च्या वारसांना आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील संतोष भीमाशंकर तांगतोडे याचा पुराच्या पाण्यात वाहून जावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्याबाबत आ.आ

कोपरगाव तालुक्यात मान्सूनपूर्व कामाला वेग
वेस-सोयगाव तलावाच्या 9.98 कोटींच्या कामास मान्यता
श्री साईगाव पालखीचे पूजन करून आ. काळेंनी दिल्या शुभेच्छा

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील संतोष भीमाशंकर तांगतोडे याचा पुराच्या पाण्यात वाहून जावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी तात्कालीन तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना मयत संतोष तांगतोडे याच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सुचनेनुसार प्रशासनाने कार्यवाही करून मयत संतोष तांगतोडे याच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असून हा मदतीचा धनादेश नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते वारसांना देण्यात आला.
कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील तांगतोडे कुटुंबातील संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे तिघे भाऊ गोदावरी नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मंजूर येथे गोदावरी नदीकाठी असलेला आपला वीजपंप बाहेर काढण्यासाठी गुरुवार (दि.25 जुलै) रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संतोष भीमाशंकर तांगतोडे हा पुराच्या पाण्यात वाहून जावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे मयत संतोष तांगतोडे याच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांना चार लाख रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. त्या मदतीचा धनादेश आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत संतोष तांगतोडे याच्या कुटुंबियांना देण्यात आला. तसेच कोपरगाव नगरपरिषदेत शासकीय नियमानुसार लाभधारकांना वारसा हक्काने दिल्या जाणार्‍या नोकरीचे नियुक्ती पत्र व भूमी अभिलेख कार्यालयामार्फत स्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांना सिटी सर्व्हेच्या सनदीचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS