Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी करावी

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर ः महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असुन या योजनेस आपल्या जिल्ह्य

माजी प्राचार्य कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान    
स्काऊटचे पुनुरुज्जीवन ही काळाची गरज- डॉ. सुधीर तांबे
शाहीर एकनाथ सरोदे यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार

अहमदनगर ः महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असुन या योजनेस आपल्या जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसंदर्भात येत्या 22 ऑगस्ट रोजी शिर्डी येथे राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व अधिकारी व कर्मयचार्‍यांनी समन्वयातुन व एकत्रितपणे काम करत हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनाकार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने  मुख्यमंत्री-माझी बहिण योजना सुरु केली आहे. जिल्ह्यात या योजनेची अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाली असुन 7 लाखापेक्षा अधिक महिला भिगीनींचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या भगिनींना दरमहा 1 हजार 500 रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार असुन भगिनींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. जिल्ह्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासुन वंचित राहू नये यासाठी अधिकाधिक महिलांची नोंदणी करुन त्यांना लाभ देण्याचे आवाहनही पालकमंत्री  विखे पाटील यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमास येता यावे यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकार्‍यांनी  गावनिहाय रूटप्लॅन, लाभार्थी वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतील यादृष्टीने नियोजन करावे. कार्यक्रमास येणार्‍या लाभार्त्यांची संख्या अधिक असल्याने आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य पथक, रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात यावी. या कार्यक्रमाची ग्रामीण स्तरापर्यंत व्यापक स्वरुपात प्रचार, प्रसिद्धी करण्याच्या सुचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या
           जिल्ह्याच्या विकासामध्ये भर घालणार्‍या अनेक प्रकल्पांचा शुभारंभ व भूमीपुजनही यावेळी करण्यात येणार आहे. शिर्डी येथे औद्योगिक वसाहत, ईटी आयव्हीलॅब, शिर्डी येथील थीम पार्क, अपर जिल्हाधिकारी कार्यालय,शिर्डी अकोले येथील तहसिल कार्यालय, नवीन तलाठी कार्यालये, श्री साईबाबा शिर्डी संस्थान शैक्षणिक संकुल तसेच  शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, सावळी विहिर या उपक्रमांचा शुभारंभ व भूमीपुजन करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेचा आज शुभारंभ – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत 7 लक्ष महिलांचे अर्ज पात्र ठरले असुन पात्र ठरलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यावर जुलै व ऑगस्ट, 2024 या दोन महिन्याचे प्रत्येकी 1 हजार 500 रुपयांप्रमाणे एकूण 3 हजार रुपयांचा प्रत्यक्ष निधी वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 17 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून बालेवाडी क्रीडासंकुल, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रक्षेपण, सहकार सभागृह, अहमदनगर येथुन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

COMMENTS