Homeताज्या बातम्यादेश

केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन नाहीच

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयानेे नकार दिला आ

बाबरी, गोध्रा संबंधित सर्व खटले होणार बंद :सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
विधिमंडळ सर्वोच्च न्यायालय नाकारू शकत नाही
न्यायालयीन कामकाजात गुजराती भाषेचा वापरास सर्वोच्च न्यायालयाचा नकार कायम

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयानेे नकार दिला आहे. या जामीन याचिकेवर बुधवार सुनावणी पार पडली. केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्यात ईडीनंतर सीबीआयने अटक केली आहे. या अटकेविरोधात त्यांना जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आजचे प्रकरण सीबीआयच्या अटकेशी संबंधित आहे. मद्य धोरण प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने 26 जून रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी सुनावणी केली. केजरीवाल यांच्या वतीने वकील एएम सिंघवी न्यायालयात हजर झाले. 

COMMENTS