Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्त विद्यापीठात एस. आर. रंगनाथन यांचा जयंती दिन ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठाच्या ग्रंथालय आणि माहिती स्रोत केंद्रात ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री एस. आर. रंगनाथन यांचा

टाॅयलेट- एक ‘फ्रेम’कथा
श्रीगोंद्यात शिवसेनेच्या युवासेनेत पक्षप्रवेश व कार्यकारिणी जाहीर
कोपरगावात ब्लॅक बेल्ट कराटे कॅम्प परीक्षा उत्साहात

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठाच्या ग्रंथालय आणि माहिती स्रोत केंद्रात ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री एस. आर. रंगनाथन यांचा जयंती दिन ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विद्यापीठाच्या ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन देखील आयोजीत करण्यात आले होते.   

कार्यक्रमास डॉ. राम ठाकर संचालक व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास, डॉ. दयाराम पवार, संचालक विद्यार्थी कल्याण केंद्र, प्रा. डॉ. कविता साळुंके, संचालक, स्कुल ऑफ ऑन लाईन लर्निंग, प्रा. डॉ. माधुरी सोनवणे, संचालक, कृषी विज्ञान विद्याशाखा, डॉ. अभिषेक भागवत, श्री. नागार्जुन वाडेकर, संचालक मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा, श्री. विजयकुमार पाईकराव, श्री. राजेंद्र वाघ, संचालक, एन.एस.एस., डॉ. सुभाष सोनुने, डॉ.मधुकर शेवाळे, संचालक, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्र, श्री. शरद शेजवळ, श्री. किशोर मोरे, श्रीमती स्मिता सोनसळे, श्री निरंजन गोसावी, ग्रंथालय कर्मचारी वृंद, तसेच प्रि-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालय आणि माहिती स्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. प्रकाश बर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS