भालगाव ः नेवासा तालुक्यात सत्संग, भजन, किर्तन, प्रवचन सेवा देण्यासाठी फिरत असताना मंदिरा समोर सभामंडप, मंदिराचे वालकंपाऊट, मंदिर परिसरात ब्लाँक,
भालगाव ः नेवासा तालुक्यात सत्संग, भजन, किर्तन, प्रवचन सेवा देण्यासाठी फिरत असताना मंदिरा समोर सभामंडप, मंदिराचे वालकंपाऊट, मंदिर परिसरात ब्लाँक, पाण्याच्या टाकी असे विवीध विकास कामे आमदार शंकरराव गडाखांनी पुर्ण केले आहेत. आमदार गडाखांचे विवीध विकास कामांबरोबरच मंदिर विकास कामांमुळे आध्यात्मीक वैभवात निच्छीतच भर पडत असल्याचे गौरवौद्गार श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महारांनी भालगावातील विकास कामांच्या लोकार्पणप्रसंगी काढले.
भालगावात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गनीतुन भव्यदिव्य हनुमान मंदिराचे काम पुर्णत्वाकडे आहे. आमदार गडाखांनी विकास निधीतुन मंदिर परीसरासाठी वालकंपाऊंट तसेच भालगावातील गुप्ताई माता मंदिर परीसरात सभामंडप व पाण्याच्या टाकीचे लोकार्पन आमदार शंकरराव गडाखांच्या उपस्थीतीत महंत सुनिलगीरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी हनुमान मंदिर कमिटी व गुप्ताई माता भक्त मंडळाच्या वतीने महंत सुनिलगिरी महाराजांचे संतपुजन व आमदार गडाखांचा सन्मान करण्यात आला. भालगावचे पोलिस पाटिल बाळकृष्ण भागवत यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन आमदार गडाखांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. यावेळी भालगाव परीसरातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थीत होते.
COMMENTS