Homeताज्या बातम्यादेश

स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानीत चोख सुरक्षा व्यवस्था

700 कॅमेर्‍यासह 10 हजार पोलिसांची फौज तैनात

नवी दिल्ली ः स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी राजधानीत जय्यत तयारी करण्यात येत असून, दिल्ली पोलिसांनी राजधानीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आ

शिंदे गटानी सेनाभव ताब्यात घेतल्यास नवल नाही –  खा प्रताप पाटील चिखलीकर
पाणीटंचाई संयुक्त पथकाला मोतीबिंदू झालाय का ?
गैरव्यवहार करा आणि ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ बना !

नवी दिल्ली ः स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी राजधानीत जय्यत तयारी करण्यात येत असून, दिल्ली पोलिसांनी राजधानीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी 700 चेहर्‍याची ओळख असलेले सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले आहेत.दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमासाठी 3 हजाराहून अधिक वाहतूक पोलीस अधिकारी, 10 हजार पोलीस कर्मचारी आणि 700 कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे बसवले आहेत.  हे कॅमेरे उत्तर आणि मध्य जिल्ह्यांमध्ये आणि विशेषत: लाल किल्ल्यावर बसवले जातील जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी भाषण करतील आणि व्हीव्हीआयपी हालचालींवर लक्ष ठेवतील आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवतील.

उत्तर जिल्ह्याला 346 क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे तर मध्य जिल्ह्याला 354 कॅमेरे देण्यात येणार आहेत. या कॅमेर्‍यांमध्ये हाय रिझोल्यूशनसह पॅन-टिल्ट-झूम फीचर्स असतील ज्यामुळे पोलिसांना दूरवरून कोणालाही ओळखता येईल. हे कॅमेरे किल्ल्याभोवती लावण्यात येणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. चेहर्‍याची ओळख आणि व्हिडिओ अ‍ॅनालिटिक सिस्टीम असलेले कॅमेरे चोख सुरक्षा सुनिश्‍चित करतील, असे सांगून अधिकारी म्हणाले की, मोदी जेव्हा देशाला संबोधित करतील तेव्हा मुघलकालीन किल्ल्यावर 10 हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. कार्यक्रम संपेपर्यंत लाल किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर ’नो ड्रोन झोन’ म्हणून निश्‍चित करण्यात येणार आहे.  मोक्याच्या ठिकाणी आवश्यक उपकरणांसह जवान तैनात केले जातील, असे पोलिसांनी सांगितले. 700 कॅमेर्‍यांपैकी 40 कॅमेर्‍यांचा वापर चेहरा ओळखण्यासाठी, 15 कॅमेरे घुसखोरी शोधण्यासाठी, प्रत्येकी 10 कॅमेरे वाहनांच्या नोंदणी प्लेट वाचण्यासाठी आणि लोकांची मोजणी करण्यासाठी आणि पाच बेवारस वस्तू शोधण्यासाठी वापरले जातील. लाल किल्ल्यावर परंपरेप्रमाणे ड्रोनविरोधी यंत्रणा बसविण्यात येणार असून हवाई संरक्षण तोफा बसविण्यासह दहशतवादविरोधी अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, एलिट स्वाट कमांडो, ड्रोन पकडणारे आणि शार्पशूटर मोक्याच्या ठिकाणी तैनात असतील. दिल्ली पोलिसांनीही गस्त आणि घातपात विरोधी तपासणी वाढवली आहे.

COMMENTS