Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शहरात अवैध बार गुटखासह व्यवसाय जोमात

पोलिस प्रशासनाची मात्र हाताची घडी तोंडावर बोट !

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यासह शहरात गुटखा बंदी असतानाही पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर विनापरवाना बार, गुटखाबंदी असतानाही राजरोसपणे गुटखा व

LokNews24 l फोन टॅपिंगच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव
चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा निर्घूण खून;
लॉकडाऊनमुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प !!

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यासह शहरात गुटखा बंदी असतानाही पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर विनापरवाना बार, गुटखाबंदी असतानाही राजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. श्रीगोंदा शहरातुन इतरत्रही मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवठा केला जातो. राजरोसपणे जुगार, मटका, विनापरवाना बार व गुटखा विक्री सारखे अवैध धंदे चालू असताना श्रीगोंदा पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत  आहेत हा श्रीगोंद्यातील नागरीकांना पडलेला मोठा प्रश्‍न आहे.
दारु सह जुगार मटका यामुळे अनेक कूटुंब उध्वस्त झाले आहेत तर काहींचे संसार रस्त्यावर आले आहेत. याचबरोबर अवैध  व्यवसयिक यांच्यात जीवघेणी स्पर्धा असल्याचे समोर आले आहे. या स्पर्धेतून व्यावसायिक एकमेकांच्या विरोधात माहिती देऊन कोणाचा व्यवसाय सुरू, कोणाचा बंद यासह अन्य माहिती पोलीस प्रशासनास पुरवताना दिसत आहे. मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत असून या सर्वांचा बंदोबस्त कधी होणार ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा शहरासह तालुक्यात सर्रास खोलवर रुजलेले अवैध  व्यवसाय आणि त्यातून सुरू असलेले गुन्हेगारीकरण याचे समिकरण असल्याचे दिसत आहे. यातून अवैध काम करणार्‍या या व्यवसायिकांमध्ये मोठी चुरस असून तेच आता एकमेकांची गुपिते उघड करताना दिसत आहेत. मात्र, यात तालुक्यातील तरुणांचे दुहेरी नुकसान होत असून व्यवसायात गुंतलेले गुन्हेगारीकडे तर खाणारे जीवघेण्या रोगाच्या विळख्यात जाताना दिसत आहेत. जेथे टपरी तेथे सहज गुटखा उपलब्ध होणार्‍या गुटखा विक्रीकडे पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष का ? असा प्रश्‍न श्रीगोंद्यातील नागरिकांना  पडला असून सुंगधी तंबाखू, सुपारीच्या नावाखाली सध्या अनेकांकडून उखळ पांढरे करून घेण्यात येत आहे. तालुक्यातील अन्य गुन्हेगारीच्या मुसक्या आवळणार्‍या प्रशासनाचे गुटखा व्यवसायिकाकडे दुर्लक्ष कसे असू शकते, असा प्रश्‍न असून तालुक्यात गुटखा मालाची पोहच करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. यात प्रामुख्याने तरुणांचा भरणा अधिक असून त्यांच्यात देखील व्यवसायावरून टोळी युध्द भडकण्याची शक्यता आहे. यामुळे तातडीने तालुक्यातील गुटखा विक्री बंद करण्याची मागणी होत आहे. शहरातील अवैध धंदे लवकर बंद झाल्यास सामाजिक संघटना याविरोधात आवाज उठविणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनानी वेळीच जागे होऊन अवैध व्यवसायांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

COMMENTS