अरिहंत भगवान मूर्तीच्या अखंड शिलेचे नगरमध्ये स्वागत ; सामूदायिक शांतीमंत्र पठणात पुष्पहार अर्पण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरिहंत भगवान मूर्तीच्या अखंड शिलेचे नगरमध्ये स्वागत ; सामूदायिक शांतीमंत्र पठणात पुष्पहार अर्पण

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे नमोकार तीर्थ निर्मिती होत असून, या पवित्र स्थळी अरिहंत भगवान मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रोटरी क्लबतर्फे करणार कमर्शिअल चक्की वाटप
निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी लावले एक पेड माँ के नाम
अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी

अहमदनगर/प्रतिनिधी- नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे नमोकार तीर्थ निर्मिती होत असून, या पवित्र स्थळी अरिहंत भगवान मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कर्नाटकमधील बेंगलोर जवळच्या देवनहळ्ळी येथून 365 टन वजनाचा क्रिम कलरचा ग्रेनाईड पाषाण (शीळा) 144 टायरच्या ट्रेलरमधून नेला जात आहे. नगरमार्गे जाणार्‍या या शीळेचे स्वागत नगरमधील जैन समाजबांधवांनी मंगळवारी केले. सामूदायिक शांतीमंत्र पठणात या शीळेवर पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

    अरिहंत भगवान मूर्तीसाठी 365 टन वजनाची अखंड शीळा नगर शहरालगतच्या बायपास चौकात सोलापूर रस्त्याने आली होती. हैद्राबाद, सोलापूर, मोहोळ, मोडलिंब, टेंभुर्णी, करमाळा मार्गे मंगळवारी भल्या सकाळी नगर शहरातील बायपास चौकात या महाकाय शिळेचे आगमन झाले. नगर शहरातील जैन भाविकांनी भक्तिपूर्ण वातावरणात या महाशिलेचे स्वागत केले. संजय पहाडे यांनी सामूदायिक शांतीमंत्राचे पठण करत महाकाय शिलेस पुष्पहार घालून स्वागत केले. प.पू.ज्ञानयोगी प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य देवनंदी गुरूदेव यांच्या संकल्पनेमधून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे नमोकार तीर्थ साकारले जात आहे. येथे अरिहंत भगवान मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे व त्यासाठी 365 टन वजनाची ही शीळा चांदवडला नेली जात आहे. नगरकरांच्यावतीने या महाशिलेचे स्वागत करून निरोप देण्यात आला. बायपास रोडने महाशिलेने नाशिककडे प्रस्थान केले. ऐतिहासिक महाशिलेचे स्वागत केल्याचे समाधान उपस्थित सर्वांच्या चेहर्‍यावर झळकत होते. यावेळी समाजाचे जैन समाजाचे अध्यक्ष महावीर बडजाते, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्यासह उद्योजक नरेंद्र फिरोदिया, रवींद्र बाकलीवाल, संजय चोपडा, वसंत लोढा, किरण मणियार, संजय कासलीवाल, अभिजित खोसे, नंदलाल गंगवाल, भारत चुडीवाल, विनय बिनायके, कुशल पांडे, रवि कासलीवाल, संजय महाजन, महावीर गोसावी, विजय औटी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनीही नगरकरांच्यावतीने या शिलेचे स्वागत केले.

रोज 40 किलोमीटरचा प्रवास

ही 365 टन वजनाची भव्य शीळा घेऊन जाणार्‍या 144 चाकांच्या ट्रेलरचे मालक व चालक कुलदीपसिंह म्हणाले, देवणहळ्ळीजवळच्या छप्पडकल्ल तलावाच्या पाण्यात हा पाषाण कोरण्यासाठी तब्बल तीन महिन्याचा कालावधी गेला. तेथून मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी तीन दिवस गेले. चार मोठ्या क्रेनच्या सहाय्याने ही शीळा ट्रेलरवर विराजमान करण्यात आली. नऊ जणांची आमची टीम ही शीळा घेऊन निघाल्यापासून शुध्द शाकाहारच करत आहे. 1300 किलोमीटरचे अंतर 40 दिवसात पार करून चांदवडला पोहोचणार आहोत. ताशी दहा ते बारा किलोमीटरच्या वेगाने दररोज 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS