Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अधिवेशनाला सुरूवात

अकोले ः अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित अधिवेशनाला शनिवारी सुरूवात झाली आहे. शनिवार आणि रविवारी दोन दिवस नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृह

जेऊर बाजारतळावर दगडफेक
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख अचानक सोनईत दाखल
मुख्याधिकार्‍यांनी पाणीपुरवठा सुरळीत करावा ः प्रांतधिकारी प्रसाद मते

अकोले ः अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित अधिवेशनाला शनिवारी सुरूवात झाली आहे. शनिवार आणि रविवारी दोन दिवस नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेले आहे. अशी माहिती राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.

अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया,  ोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालविणारे संजय यादवराव,  शेतकर्‍यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष श्री विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक श्री शशिकांत जाधव हे या सत्रात भाग घेणार आहेत. त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते हे घेणार आहेत. दुपारच्या सत्रामध्ये मराठ्यांचे शिक्षण आणि आरक्षण महिला व युवकांचे भवितव्य आणि दिशा या विषयावर लखनऊ व स्वामी रामानंद या दोन्ही विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे, आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे  अमरावती येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख हे या परिसंवाद भाग घेणार आहेत.  या राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाच्या समारोपीय  सत्रात विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.  अधिवेशनाचा समारोप राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या भाषणांनी होईल. या अधिवेशनात छत्तीसगड हरियाणा कर्नाटक गोवा हैदराबाद याचबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी या राष्ट्रीय अधिवेशनास सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव लालूशेठ दळवी नगर जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव डवले सरचिटणीस रमेश बोरुडे भाऊसाहेब वाकचौरे उपाध्यक्ष भानुदास गायकर भाऊसाहेब वराळे यांनी केले आहे. 

COMMENTS