Homeताज्या बातम्याविदेश

बांगलादेशमध्ये सरन्यायाधीशांचा राजीनामा

हिंसक जमावाने सर्वोच्च न्यायालयाला घातला होता घेराव

ढाका : बांगलादेशात सुरू असलेले आंदोलन अजूनही शमलेले नाही. शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून, मोहम्मद युनूस यांनी सत्तेची

हमारी माँगे पुरी करो…कष्टकर्‍यांचा घुमला आवाज
WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा |
मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत

ढाका : बांगलादेशात सुरू असलेले आंदोलन अजूनही शमलेले नाही. शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून, मोहम्मद युनूस यांनी सत्तेची सूत्रे सांभाळली असली तरी हिंसासाचा कमी झालेला नाही. शनिवारी शेकडो बांगलादेशी आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांनी दुपारी 1 वाजेपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. जमावाने इतर न्यायाधीशांनाही त्यांची पदे सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनी राजीनामा दिला आहे.
आंदोलकांनी मुदतीपूर्वी राजीनामा न दिल्यास न्यायाधीशांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची देखील धमकी दिली होती सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि ते पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निष्ठावंत मानले जातात. सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यार्थी आणि वकिलांसह शेकडो आंदोलकांनी सरन्यायाधीश आणि अपीलीय विभागाच्या न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराला घेराव घातला. दरम्यान, हंगामी सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद यांनी फेसबुकवर पोस्ट करत सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांचा बिनशर्त राजीनामा द्यावा आणि पूर्ण न्यायालयाची बैठक थांबवावी, अशी मागणी केली. या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांनी न्यायालयाचे कामकाज व्हर्च्युअल पद्धतीने चालणार की नाही याचा निर्णय घेण्यासाठी बोलावलेली बैठक व न्यायालयीन कामकाज पुढे ढकलले. सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

COMMENTS