Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनलक्ष्मी शाळेत आदिवासी लोकजिवनाची झलकी

नाशिकः आदिवासींची दुःखं, त्यांचं जगणं, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी कुणालाच माहीत नाहीत. म्हणूनच आदिवासींना समाजात सामावून घेता यावे यासाठी

धनलक्ष्मी शाळेत उपक्रमातून साकारत आहे लोकशाही शिक्षण
धनलक्ष्मी शाळेत पालक मेळावा संपन्न
धनलक्ष्मी शाळेत शिवजयंतीनिमित्त दुमदुमला शिवरायांचा जयजयकार

नाशिकः आदिवासींची दुःखं, त्यांचं जगणं, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी कुणालाच माहीत नाहीत. म्हणूनच आदिवासींना समाजात सामावून घेता यावे यासाठी ९ ऑगस्ट आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बाल विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेत आदिवासी दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आदिवासी लोकजीवन, त्यांची संस्कृती, चित्रकला यांची प्रदर्शनी यानिमित्ताने भरवण्यात आली होती. सोबतच आदिवासी नृत्याने आदिवासी लोककलेची झलक यावेळी विद्यार्थ्यांनी दाखवली. 

      या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, संस्था सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थिताना आदिवासी लोकजीवन, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी याबद्दल प्रकाश कोल्हे यांनी माहिती दिली. ज्योती कोल्हे यांनी आदिवासी संस्कृतीचा परिचय करून दिला. नाशिक परिसरातील आदिवासींचे जीवन सुधारावे यासाठी मानवधन संस्थेतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने पाड्यावरील दिवाळी साजरी केली जात असते. त्यासोबतच उन्हाळ्यात या दुर्गम व आदिवासी पाड्यांवरील बांधवांना चप्पल-बूट यांचे वाटप करणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे, आरोग्य संबंधी जनजागृती करणे इत्यादी भरीव कार्य मानवधन संस्थेतर्फे होत आहे.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार निवृत्ती यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी पूनम गुळवे, गया पानसरे, योगिता तांबे, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

COMMENTS