Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कै. विष्णू उस्ताद आखाडा ठरतोय नागपंचमीची ओळख बदलवणारा आखाडा

जामखेड ः जामखेडची पंचमी म्हटलं की भल्या-भल्याना भुरळ पडते. तो घुंगरांचा आवाज..अस म्हणल् जातं की घुंगराचा आवाज आल्याशिवाय पाऊस ही पडत नाही, आणि अश

खा. लोखंडेंनी मानहानीचा दावा करून आपली स्वच्छ प्रतिमा का सिद्ध केली नाही ?
साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद संपन्न
बदलापूर अत्याचारग्रस्त बालिकांना न्याय द्या

जामखेड ः जामखेडची पंचमी म्हटलं की भल्या-भल्याना भुरळ पडते. तो घुंगरांचा आवाज..अस म्हणल् जातं की घुंगराचा आवाज आल्याशिवाय पाऊस ही पडत नाही, आणि अश्याच महाराष्ट्रात नावाजलेल्या जामखेडची नागपंचमी आता युवा पिढीतील एक आदर्श की ज्या युवा न आजची पिढी लाल मातिकडे कशी वळवता येईल यासाठी गेली 22 वर्ष प्रयत्न करत आहे तो युवा म्हणजे अजय विष्णू काशीद. सालाबादप्रमाणे 22 व्या वर्षी ही जामखेडमधे नागपंचमी निमित भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान कै. विष्णू उस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ अजय दादा काशीद यांच्या पुढाकाराने मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप महाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या अनुभवातून हे मैदान शनिवार 10 ऑगस्ट रोजी जामखेड महविद्यालय जामखेड येथे संपन्न होत आहे. यावर्षी या आखड्यासाठी प.पू.महामंडलेश्‍वर श्री श्री 1008 इश्वरानंद ब्रह्मचारीजी महाराज श्री उत्तम स्वामी जी इंदौ र हे खास इंदौर मध्यप्रदेश या ठिकाणावरून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर श्री क्षेत्रअश्‍वलिंग संस्थान पिंपळ वंडी चे ह भ.प.महादेवानंद भारती महाराज, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य राम शिंदे,  सुरेश धस, माजी खासदार सुजय विखे, आमदार बाळासाहेब आजबे, डी वाय एस पी राहुल आवारे, माजी राज्यमंत्री रविकांत तुपकरआदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य आखाडा रंगतदार होणार आहे. या वर्षी या आखड्याच वैशिठ्य म्हणजे पहिली मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उप महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे यांच्यात रंगणार आहे.दुसरी कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन महारुद्र कालेलआणि उत्तर महाराष्ट्र केसरी सुदर्शन कोतकर यांच्यात हा थरार होणार आहे. या सोबतच अनेक रोमहर्षक कुस्त्यांचे थरार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र बाहेरील पैलवान याठिकाणी हजेरी लावतात म्हणून या आखाढ्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सर्वांनी या आखड्यास उपस्तिथ राहून मल्लांना प्रोसहित करावे असे आवाहन आयोजक सारोळा गावचे सरपंच भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांनी केले आहे.

COMMENTS