Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालया कडून सत्कार

पाथर्डी ःपार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबुजी आव्हाड महाविद्यालयांमध्ये कु. विजया रामदास कंठाळे हिचा भव्य सत्कार संपन्न झाला. एम पी एस सी मार्फत घ

आव्हाड महाविद्यालयातील बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
आव्हाड महाविद्यालयात इंग्रजी निबंध स्पर्धा उत्साहात
आविष्कार स्पर्धेत आव्हाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

पाथर्डी ःपार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबुजी आव्हाड महाविद्यालयांमध्ये कु. विजया रामदास कंठाळे हिचा भव्य सत्कार संपन्न झाला. एम पी एस सी मार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये तिने यश संपादन करून पीएसआयपदी ही निवड झाली असून एनटीड या प्रवर्गातून ती राज्यात पहिली आलेली आहे.
पाथर्डी तालुक्यातील यावर्षीच्या एमपीएससीच्या निकालामध्ये सुद्धा ती एकमेव विद्यार्थिनी आहे. पाथर्डी तालुक्यातील तीन खडी या गावची ती रहिवासी असून शेतकरी कुटुंबामधील विद्यार्थिनी असून तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून  हे यश संपादन केलेले आहे.कोणत्याही क्लासचे मार्गदर्शन न घेता स्वयं अध्ययन करून या पदापर्यंत ती पोहोचली आहे. जिद्द चिकाटी आणि सातत्य या गोष्टीच्या आधारे आणि आत्मविश्‍वासाने अभ्यास केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे अशक्य नाही हे तिने आपल्या मनोगतातून व्यक्त केले. स्वतःच्या आत्मविश्‍वासाबरोबरच आई-वडिलांचा विश्‍वास संपादन करणे हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असून संगणक युगात मोबाईल सारख्या साधनांचा वापर करताना काळजीपूर्वक आणि मोबाईलच्या अति आहारी जाऊ नये असाही सल्ला देणे विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. बी ए चौरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्राध्यापक पर्यवेक्षक सलीम शेख सर , चेमटे मॅडम, प्रा. ससाने सर हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आशा पालवे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक सलीम सर यांनी मानले

COMMENTS