Homeताज्या बातम्याविदेश

नीरज चोप्राने घेतला रौप्यपदकाचा वेध

सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तिसरा खेळाडू

पॅरिस ः भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले नसले तरी, भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. 26 वर्षीय नीरजने 89.45

नीरज चोप्राची पुन्हा सुवर्ण कामगिरी
खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं दु:खद – नीरज चोप्रा
नीरज चोप्राची वर्ल्ड चॅम्पियन शिपच्या फायनलमध्ये धडक

पॅरिस ः भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले नसले तरी, भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. 26 वर्षीय नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले. यासह सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा नीरज हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजच्या आधी कुस्तीपटू सुशील कुमार आणि शटलर पीव्ही सिंधू यांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली होती. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पाचवे पदक आहे, याआधी भारताने 4 कांस्यपदके जिंकली होती. ज्यापैकी 3 नेमबाजीत आणि एक हॉकीत पटकावले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने भालाफेकमध्ये नवीन ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने 92.97 मीटर भालाफेक केली. अर्शदचे 2 थ्रो 90 मीटरपेक्षा जास्त होते. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटर भालाफेक करून कांस्यपदक जिंकले. नीरजच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले नीरज हे उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. त्याने आपली प्रतिभा वेळोवेळी दाखवली आहे. नीरजची आई म्हणाली आमच्यासाठी चांदी सोन्यासारखी आहे, ज्याने सोने जिंकले तो माझा मुलगा आहे. वडील म्हणाले ’दुखापतीमुळे त्रास झाला, नीरजचे पदक विनेशला समर्पित आहे. नीरजने 2010 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी भालाफेक सुरू केली होती.

सर्वोत्तम खेळ केला ः नीरज चोप्रा – देशासाठी आपण जेव्हाही पदक जिंकतो, तेव्हा आनंद होतोच. रौप्य पदक जिंकलो, याचाही आनंद आहेच. मात्र सुवर्ण पदक हुकले याचे दुख:ही मनात आहे. पण आता स्वत:मध्ये सुधारणा करण्याची वेळ आहे. याबाबत टीमसोबत बसून चर्चा करेन. माझ्या कामगिरीत आणखी सुधारणा करेन. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्यल्या पदकांची तुलना कोणीही या ऑलिम्पिमकमधल्या पदकांशी करू नये. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूने त्यांचा सर्वोत्तम खेळ केला असल्याचे नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर सांगितले.

COMMENTS