Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंत स्टडी क्लबच्या दोन विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड

एका विद्यार्थीनीची परिचर्या विभागप्रमुखपदी निवड

नेवासाफाटा : मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील यशवंत स्टडी क्लब येथील दोन विद्यार्थ्यांची सैन्य दलात तर एका विद्यार्थीनीची परिचर्या विभागप्

भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी ओव्हरफ्लो.
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाचा राहुरीत मोर्चा
रात्री प्रवाशांना लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले

नेवासाफाटा : मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील यशवंत स्टडी क्लब येथील दोन विद्यार्थ्यांची सैन्य दलात तर एका विद्यार्थीनीची परिचर्या विभागप्रमुखपदी मुंबई येथे नुकतीच नेमणूक झाल्याबद्दल गुणवत्त विद्यार्थ्यांचा यशवंत स्टडी क्लब आणि नेवासा प्रेसक्लबच्यावतीने सत्कार करण्यात आला. नेवासा तालुक्यातील पिचडगांव येथील यशवंत स्टडी क्लबचे दीपक गव्हाणे यांची एसआरपीएफ दौंड या ठिकाणी तर दादासाहेब लबडे याची छञपती संभाजीनगर येथे नियुक्ती झालेली असून प्रियंका गायकवाड या विद्यार्थीनीची परिचर्या विभागप्रमुखपदी मुंबई येथे नुकतीच निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष युवानेते उदयन गडाख-पाटील, संस्थेच सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, समन्वयक महेश मापारी, बाळासाहेब नगरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार राजेंद्र वाघमारे, अशोकराव डहाळे, मोहन गायकवाड, कैलास शिंदे, सुहास पठाडे, शंकर नाबदे, जयकुमार गुगळे यांच्या उपस्थितीत नेवासकरांच्यावतीने करण्यात आला. ग्रामीण भागात जन्माला येऊनही प्रयत्नांच्या स्वप्नांची क्षितिजे गाठता येतात जिद्द व कठोर मेहनत करण्याची तयारी असेल तर यश निश्‍चितच मिळते हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेले असल्याचे यावेळी गौरोद्गारही यावेळी मान्यवरांनी सत्कार समारंभात बोलतांना काढले. अतिशय खडतर प्रवासातून हे यश विद्यार्थ्यांनी संपादन केलेले असून सर्व विद्यार्थी या यशात निश्‍चितच प्रेरणादायी व अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे यातून विद्यार्थी निश्‍चितच प्रेरणा घेत सुयश संपादन करतील असा विश्‍वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त करुन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन यशवंत स्टडी क्लबच्या सशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

COMMENTS