Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस प्रमाणपत्र मिळवणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

अशोक सब्बन ः ऑगस्ट क्रांती र्दिीह सत्याग्रह आंदोलन करणार

अहमदनगर ः राज्यात आणि देशात दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा गाजत आहे. मात्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयात व्यक्ती तपासणीसाठी आलेली नसतानाही शासनाच्या ’स्व

ट्विटरवर संमतीशिवाय इतरांचे फोटो शेअर करता येणार नाही | DAINIK LOKMNTHAN
खासदार लंके यांचे निवडणूक निधी देणार्‍यांसाठीच आंदोलन ?
संगमनेमध्ये राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर ः राज्यात आणि देशात दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा गाजत आहे. मात्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयात व्यक्ती तपासणीसाठी आलेली नसतानाही शासनाच्या ’स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावर युडीआयडी क्रमांक मिळवत काही व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवल्याचे प्रकरण नुकतेच जिल्ह रुग्णालयात उघडकीस आले आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक ’साहेबराव डावरे यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश वैद्यकीय अधिकायांना दिलेला आहे. तरीही जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांनी’ गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनसंसदेचे अशोक सब्बन यांनी केली आहे.

जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी न होताच शासनाच्या संकेतस्थळावर दिव्यांग प्रमाणपत्र कसे आली? ही गंभीर बाब आहे याबाबत गुन्हा दाखल होऊन अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची तातडीने सायबर पथकामार्फत चौकशी व्हावी रुग्णालयामध्ये व्यक्तींची तपासणी न परस्पर शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळा वरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले त्या दिव्यांगांची नोंदणी संबंधित शासकीय रुग्णालयामध्ये आहे का? त्यांच्या वैद्यकीय तपासण्या अभिलेख या रुग्णालयामध्ये आहेत का तसेच मागील 25 वर्षाच्या कालावधीतील हे अभिलेख तपासले जावे अशी अशी मागणी भारतीय जनसंसद यांच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय येथे सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनसंसदेचे जिल्हा अध्यक्ष  सुधीर भद्रे व सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांनी दिला आहे. यावेळी अशोक भोसले, पोपट साठे, सुनील टाक, बाळासाहेब पालवे, वीरबहादुर प्रजापती, अशोक डाके, जसवंतसिंह परदेशी, राम धोत्रे प्रकाश गोसावी, कैलास पठारे यांसह अनेकांची उपस्थिती होती.

COMMENTS