Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या श्रीरामपूर विधानसभा समितीत खंडागळे यांची सदस्यपदी नियुक्ती

बेलापूर प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ’मुख्यमंञी माझी लाडकी बहिण’ योजनेच्या श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक

मनरेगाकडून 2.30 कोटी निधी मंजूर ः आ. आशुतोष काळे
स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन
धनदांडग्याची अतिक्रमण काढण्यासाठी वंचितचा बैठा सत्याग्रह

बेलापूर प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ’मुख्यमंञी माझी लाडकी बहिण’ योजनेच्या श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे शिफारशीनुसार अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाची समिती गठीत करण्यात आली आहे.सदर समितीच्या सदस्यपदी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे नेतृत्वाखाली राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण,सामाजिक सबलीकरण,आरोग्य व आहार यात सुधारणा करणे या हेतूने ’मुख्यमंञी माझी बहिण लाडकी’या योजना जाहिर केली आहे.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने विधानसभा मतदार संघनिहाय समितीचे गठन केले आहे.यानुसार जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी नाम.राधाकृष्ण विखे पा .यांचे शिफारशीनुसार श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाची समिती पत्र क्र.शासा./संकीर्ण/ 2265/2024 दि.  5/8/24 नुसार जाहिर केली आहे. यानुसार मंजुषा महेश ढोकचौळे (अध्यक्ष), मुख्याधिकारी, नगर परिषद, गटविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास, बालविकास प्रकल्प अधिकारी, एक अंगणवाडी पर्यवेक्षीका, संरक्षण अधिकारी, यांचेसह बाजार समितीचे  उपसभापती अभिषेक खंडागळे व पुष्पलता बाळासाहेब हरदास यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तहसीलदार हे या समितीचे सचिव असणार आहेत.अभिषेक खंडागळे यांच्या नियुक्तीबद्दल तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी त्यांचा सत्कार केला. या निवडीबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, भाजपाचे विधानसभा प्रभारी नितीन दिनकर, राज्य ओ.बी.सी.सेलचे प्रकाश चित्ते, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच मुस्ताक शेख, भाजपचे नेते सुनिल मुथा, विष्णुपंत डावरे, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष हाजी इस्माईल शेख, आदिंसह गावकरी मंडळाचे नेते आदिंसह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS