नागपूर ः काटोल तालुक्यातील मूर्ती ग्राम पंचायतचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन जगन्नाथ मुन्ने (वय 54) यांना तीन लाखांची लाच घेता

नागपूर ः काटोल तालुक्यातील मूर्ती ग्राम पंचायतचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन जगन्नाथ मुन्ने (वय 54) यांना तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. या ग्राम पंचायतवर भाजपाचा सरपंच निवडून आला आहे. काटोलमधील पांडे लेआऊट येथील व्यक्तीने यासंबंधीची तक्रार केली होती. आरोपी लँड डेव्हलपर्स परेश वैकुंठराव शेळके यांच्यामार्फत हा व्यवहार झाला. मोहन जगन्नाथ मुन्ने यांनी 5 लाखांची मागणी केली. तडजोडीअंती 4 लाख रूपये घेण्याचे ठरले होते. त्यातील 3 लाख घेतांना सरपंचाला रंगेहात पकडण्यात आले आहे.
COMMENTS