गेल्या काही महिन्यांपासून जागतिक मंदीचे धक्के अनेक देशांना सहन करावे लागत असले तरी, त्याची तीव्रता इतक्या मोठ्या प्रमाणावर जाणवतांना दिसून आली ना
गेल्या काही महिन्यांपासून जागतिक मंदीचे धक्के अनेक देशांना सहन करावे लागत असले तरी, त्याची तीव्रता इतक्या मोठ्या प्रमाणावर जाणवतांना दिसून आली नाही. मात्र ती तीव्रता अलीकडच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जाणवतांना दिसून येत आहे. कारण अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्राला देखील जागतिक मंदीचे धक्के सहन करावे लागत आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागतिक मंदीचे मळभ तीव्र होतांना दिसून येत आहे. भारतासारख्या देशाला आजमितीस या मंदीचे धक्के प्रत्यक्षपणे पोहोचत नसले तरी, अप्रत्यक्षपणे ते धक्के मोठ्याप्रमाणावर बसू शकतात. त्यामुळे सावधगिरीचे पावले उचलण्याची खरी गरज आहे.
सोमवारी शेअर बाजार उघडताच गुंतवूणकदारांना धक्के सहन करावे लागले. गुंतवणूकदारांचे किमान 14 लाख कोटी रूपये स्वाहा झाले आणि शेअर बाजार का गडगडला, त्याच्या कारणांचा शोध घेण्यास सुरूवात झाली. त्यानंतर अनेक कारणे समोर आली. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका आणि जपानमधील आर्थिक घडामोडी कारणीभूत आहेत. त्यातच इराण-इस्त्रायल युद्ध, त्यानंतर बांगलादेशामध्ये निर्माण झालेली अराजकता या सर्व बाबी बघता या मंदीचे धक्के आणखी सहन करावे लागू शकतात. अमेरिकेमध्ये मोठ्याप्रमाणात बेरोजगारी आणि आर्थिक मंदीची चिन्हे दिसत आहेत. याच मंदीची चाहूल लागल्याने अमेरिकी शेअर बाजारात मोठी पडझड होतांना दिसून येत आहे. अमेरिकेत बेरोजगारीच नाही तर, महागाईचा दर देखील प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतांना दिसून येत आहे. अमेरिकेतील जागतिक मंदीचा फटका जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मंदीचा सर्वात मोठा फटका आयटी क्षेत्रातील कर्मचार्यांना बसू शकतो असे सांगितले जात आहे. याच भीतीने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केल्याने अमेरिकी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. सामान्यपणे अमेरिकी शेअर बाजारामधील घडामोडींचा जगभरातील इतर सर्वच शेअर बाजारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. अमेरिकी चलन हे जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यवहार होणार चलन आहे.
अमेरिकेनंतर दुसरीकडे जपानमधील 0.25 टक्क्यांनी वाढलेल्या व्याजदरांनी आगीत तेल ओतण्याची काम केले. जपानने व्याजदर वाढवण्यासाठी घाई केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे निक्केई देखील जोरदार आपटला. त्यानंतर पुन्हा इराण-इस्त्रायलचे युद्ध, बांगलादेशात निर्माण झालेली अराजकता, इंग्लंडमधील सत्तांतर या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेतल्यास जागतिक मंदी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात उंच टोक गाठू शकते. त्यामुळे या मंदीला आवर घालण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. अमेरिकेत बेरोजगारी वाढत असतांना, त्या देशामध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूका सुरू आहेत. आणि या निवडणुका ऐन नोव्हेंबरच्या आसपास संपू शकतात. त्यामुळे तिथे लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यातच जपानने आपले व्याजदर कमी केल्यास ते काही प्रमाणात जागतिक अर्थव्यवस्थेसाठी व्यवहार्य ठरणार आहे. यासोबतच युद्ध हा पर्याय नसल्यामुळे शांततेतून मार्ग काढण्याची गरज आहे. बांगलादेशात होत असलेले सत्तांतर, या सर्व बाबी बघता भविष्यात अनेक धोके वाढवून ठेवले आहे. जग तिसर्या युद्धाच्या उंबरट्यावर आहे. अशावेळी एक ठिणगी देखील या युद्धासाठी पुरेशी आहे. अशावेळी सर्वच देशांनी नियोजनबद्धरित्या कार्यक्रम आखण्याची गरज आहे. भारत हा सर्वच बाबतीत आत्मनिर्भर झाला असला तरी, आणि भारतातील लोकसभेच्या निवडणुका संपल्या असून, मोदी सरकार सत्तेवर असल्यामुळे या मंदीची झळक आपल्याला मोठ्याप्रमाणावर जाणवणार नसली तरी, या मंदीमुळे भारतातील महागाई वाढण्याचा धोका संभवू शकतो. त्यामुळे नियोजनबद्धरित्या पावले उचलण्याची खरी गरज आहे.
COMMENTS