Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय होणार सुरु ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यातील उत्तूर येथे योग व निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्ण

सांगली जिल्ह्यात भरधाव कार रसवंतीगृहात घुसून एका शाळकरी मुलाचा मृत्यू
शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले
सरपंच सौ. रेशमा गंभीरे महात्मा फुले समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यातील उत्तूर येथे योग व निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कागल येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय आणि तितक्याच रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी आवश्यक जागा उपलब्ध करून देतील. यासाठी एकूण 487 कोटी 10 लाख रुपये खर्च येईल. उत्तूर येथे 60 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय तसेच तितक्याच खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात येईल. यासाठी देखील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नि:शुल्क जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी एकूण 182 कोटी 35 लाख रुपये खर्च येईल.

COMMENTS