कर्जत ः शोषित आणि पीडित वर्गाच्या वेदना आपल्या क्रांतिकारी लेखणीतून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती समस्त गोरखे परिवार कोंभळी यांच्या
कर्जत ः शोषित आणि पीडित वर्गाच्या वेदना आपल्या क्रांतिकारी लेखणीतून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती समस्त गोरखे परिवार कोंभळी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंभळी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैतन्य उद्योग समूहाचे काकासाहेब गोरखे यांनी भूषविले. कार्यक्रम प्रसंगी सुनील गोरखे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार, क्रांतिकारी साहित्य लेखन आणि सद्यस्थितीतील युवकांनी घ्यावयाचा बोध याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय मनोगतातून काकासाहेब गोरखे यांनी अण्णाभाऊंच्या श्रेष्ठतम विचारांची प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करण्याचे आवाहन युवा पिढीला केले तसेच शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले.
या प्रसंगी कै. सोपानराव काशिनाथ गोरखे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार, महाराष्ट्र पोलीस यांच्या स्मरणार्थ एस. के. फर्निचर अँड इंटेरियरचे संचालक विनायक गोरखे व विशाल गोरखे यांनी प्राथमिक विद्यालयास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दोन प्रतिमांसह दोन संगणक टेबल भेट स्वरूपात मुख्याध्यापिका जयश्री सातपुते यांच्याकडे सुपुर्द केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार गांगर्डे, उपाध्यक्ष सुनील खंडागळे, सरपंच अनुराधा काकडे, माजी सरपंच विठोबा गांगर्डे, रूपचंद गांगर्डे, अमोल गांगर्डे, सचिन दरेकर, दत्तात्रय काकडे, कोंभळी सोसायटीचे बाळासाहेब गांगर्डे तसेच ग्रामपंचायत व सोसायटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक गोरखे, बाबा गोरखे, चैतन्य गोरखे, मयूर गोरखे, गणेश गोरखे, ऋषिकेश गोरखे, दत्ता मोरे, राम गोरखे, सचिन गोरखे, विकास गोरखे, राहुल गोरखे, माधव लोंढे, विशाल गोरखे, हेमंत शेलार, कुलदीप शेलार, प्रताप गांगर्डे, अजय गोरखे आणि मच्छिंद्र गोरखे यांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका जयश्री सातपुते, शिक्षक आदिकराव बचाटे, भारत बोरुडे, शहाबाई लवटे, अपर्णा साबळे यांनी अभिनव पद्धतीने विद्यालयाच्या भौतिक सुविधा पूर्ण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याबद्दल गोरखे कुटुंबीयांचे कौतुक करत आभार मानले. यापुढेही महापुरुषांची औपचारिक पद्धतीने जयंती पुण्यतिथी साजरी करण्याऐवजी अध्ययन-अध्यापन विषयक गरजा पूर्ण करणार्या भौतिक सुविधांची पूर्तता करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
COMMENTS