Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

मुंबई : आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला ताजा असतांना, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवा

कृषी मंत्री धनंजय मुंडेंसह 22 जणांची निर्दोष मुक्तता !
चंद्रपूर येथे संविधान भवन निर्माण करणार : विजय वडेट्टीवार
राष्ट्रवादी काँग्रेसने गाढव मोर्चा काढून केला केंद्र सरकारचा निषेध (Video)

मुंबई : आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला ताजा असतांना, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केला.
सीएसटीएमकडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झाला. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या दिशेने आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने मांडली आहे. आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने केली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती म्हणणे सोडून द्यावे. त्यांना जो अधिकार होता, त्याची वंश परंपरा होती, त्या वंशाचे रक्त ते पुढे घेऊन जात होते, त्या रक्तात काय होते आणि यांच्या रक्तात काय? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराज यांच्या घराण्यातील माणूस असे वक्तव्य करतो ज्या दंगल होते, तो शाहू महाराजांचा वंशज असूच शकत नाही. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.   

COMMENTS