Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिटकरींचे आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन

अकोला : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनसे- राष्ट्रवादीत वाद वाढला आहे. याप्रकरणात कारवाई करण्यास पोलीस हलगर्

जुन्या उपकेंद्राचे आणि वाहिन्यांचे सर्वेक्षण करून कामे सुरू करा : जलसंपदा मंत्री विखे पाटील
अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करणार
सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू

अकोला : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनसे- राष्ट्रवादीत वाद वाढला आहे. याप्रकरणात कारवाई करण्यास पोलीस हलगर्जीपणा करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरींनी केला. तसेच सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी करत अकोला पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर मिटकरी यांनी मुलगी आणि भावासोबत आंदोलन केले. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलिस दलातील अधिकारी मनसेच्या कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

COMMENTS