Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये नवनियुक्त खासदारांचा नागरी सत्काराचे आयोजन

मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

जामखेड ः लोकसभा निवडणूक अत्यंत कठीण होती, नेते विरोधात गेले होते अशा कठिण काळात पण जनता आणि कार्यकर्ते आदरणीय पवार साहेब यांच्यासोबत होते त्यामुळ

प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्या अगोदर दहा वेळा आरसा पहावा
कुसडगाव ’एसआरपीएफ’ केंद्र व कर्जत डेपोचे उद्या लोकार्पण
खोटे बोलणे आपली संस्कृती नाही: आमदार रोहित पवार

जामखेड ः लोकसभा निवडणूक अत्यंत कठीण होती, नेते विरोधात गेले होते अशा कठिण काळात पण जनता आणि कार्यकर्ते आदरणीय पवार साहेब यांच्यासोबत होते त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तीनही उमेदवार घवघवीत मतांनी निवडून आले अत्यंत संघर्षाच्या काळात लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले ’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे नवनियुक्त खासदार डॉ.अमोल कोल्हे (शिरुर), निलेश लंके (अहिल्यानगर), धैर्यशील मोहिते पाटील (माढा) या खासदारांचा कर्जत जामखेड मतदारसंघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही होणार आहे. आमदार रोहित पवार यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. हा कार्यक्रम मिरजगावमध्ये वखार महामंडळ गोडाऊन समोर शुक्रवारी (2 ऑगस्ट) दुपारी 2 वाजता  होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी मोठ्या पाठपुराव्यातून काम पूर्ण केलेल्या मिरजगाव, निमगाव डाकू व बिटकेवाडी या 42 किलोमीटरच्या रस्त्याचे लोकार्पण ह ,तसेच मिरजगाव येथील कर्जत जामखेड मतदारसंघातील तिसर्‍या 50 खाटांच्या अद्ययावत सेवा पुरवणार्‍या उपजिल्हा रुग्णालयाच्या (13 कोटी 64लाखाचा नीधी ) कामाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. हे रुग्णालय मिरजगावमध्ये असल्यामुळे परिसरातील गावांना याचा फायदा होणारच आहे शिवाय नगर-सोलापूर रस्ता हा मिरजगावमधून जात असल्याने या भागात अपघात झाल्यानंतर जखमींना उपचार करण्यासाठी हे रुग्णालय उत्तम पर्याय आहे. तीन उपजिल्हा रुग्णालय असलेला हा राज्यातील मोजक्या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गरजु विद्यार्थ्यांना 10 हजार सायकलचे वाटप करण्यात आले होते. तशाच पद्धतीने आणखीही काही विद्यार्थ्यांनी मागणी केली, त्यानूसार योग्य नियोजन करून आणखी 4 हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे.

*कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. नवनियुक्त खासदारांच्या सत्कार समारंभासाठी आणि आपल्याच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वाच्या असलेल्या या कार्यक्रमासाठी यजमान म्हणून आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती.*
रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

COMMENTS