Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोंडी ते निमगाव डाकू रस्त्यासाठी 2 कोटी 7 लाख मंजूर  

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

जामखेड प्रतिनिधी ः कर्जत - जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी नेहमी सतर्क आणि दक्ष असलेल्या आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुरा

कृष्णा-भीमा स्थिरीकरणात जामखेड तालुक्याचा समावेश करा
निकालाने ते खालच्या पायरीवर आले ः आ.प्रा. राम शिंदे
जामखेड नगरपरिषदेच्या मलनिःस्सारण प्रकल्पास 77 कोटी मंजूर

जामखेड प्रतिनिधी ः कर्जत – जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी नेहमी सतर्क आणि दक्ष असलेल्या आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून चोंडी ते निमगाव डाकू या प्रमुख रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा (संशोधन व विकास) या योजनेतून आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने 2 कोटी 7 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी नुकत्याच संपलेल्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून कर्जत जामखेड मतदारसंघातील 25रस्त्यांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर करून आणला होता. चोंडी ते निमगाव डाकू हा रस्ता व्हावा यासाठी या भागातील शेतकरी बांधवांनी आ. प्रा राम शिंदे यांना साकडे घातले होते. आमदार शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने चोंडी ते निमगाव डाकू या 2.7 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सरकारने 2 कोटी 7 लाख 52 हजार रूपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन (संशोधन व विकास) या योजनेतून मंजुरी दिली आहे. या भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS