Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाळीस हजार वृक्षरोपे वाटणारे पर्यावरण मित्र संदीप मालुंजकर

अकोले ः  रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे पर्यावरण डायरेक्टर, पर्यावरण मित्र संदीप मालुंजकर यांनी  झाडांचे महत्व,गरज समाजाला समजावी म्हणून विविध शाळा-

अहमदनगर : पत्रकार कुटुंबीयांचा दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात
सोशल मीडियावरील तक्रारीसाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी
ग्रामस्थांनी केली कळसुबाई शिखर कचरामुक्त

अकोले ः  रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे पर्यावरण डायरेक्टर, पर्यावरण मित्र संदीप मालुंजकर यांनी  झाडांचे महत्व,गरज समाजाला समजावी म्हणून विविध शाळा-महाविद्यालय आणि सामाजिक उपक्रमात वृक्षरोपे वाटली जावीत म्हणून 2016 पासून आतापर्यंत 40 हजार वृक्षरोपे मोफत वाटप करून आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. संबंधीतांनी वृक्षरोपण करण्याबरोबर त्यांचे संवर्धन करावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 2016 पासून त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून आंबा, जांभूळ, चिंच, वड, पिंपळ, सुरू, कडूनिंब, लिंब, कडीपत्ता यासारखी वृक्षरोपे ते नर्सरी मधून स्व:खर्चाने विकत घेऊन देतात.
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून मानव जातीला ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन वृक्षरोपन व वृक्ष संवर्धन प्रत्येकाने करावे या बाबत जन जागृती व्हावी म्हणून ते सामाजिक उपक्रमामध्ये सत्कार साठी, वृक्ष लागवडीसाठी, शाळांना, महाविद्यालयात, विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटावे या साठी वृक्ष रोपे वाटणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. लोकांचा उत्तम प्रतिसाद असून वृक्ष संवर्धन करण्याचे काम करीत आहे. असे संदीप मालुंजकर यांचा एस आर फ्लॉवर्स या नावाने शेतीपूरक व्यवसाय असून त्या माध्यमातून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न व उत्तम सेवा देण्याबाबत त्यांचा मानस असल्याने ते शेतकर्‍यांच्या विश्‍वासास पात्र ठरलेले आहे. त्यांनी व्यवसायाबरोबरच पर्यावरण बाबत काम करण्याचा त्यांचा संकल्पामुळे आतापर्यंत त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. रोटरी क्लब अकोले ने त्यांची पर्यावरणाविषयी आस्था, प्रेम लक्षात घेऊन त्यांच्यावर  या वर्षीच्या पर्यावरण डायरेक्टरची जबाबदारी दिली असून रोटरी क्लबतर्फे  केल्या जाणार्‍या वृक्षरोपणाच्या पर्यावरण  संवर्धन उपक्रमासाठी  संदीप मालुंजकर हे मोफत वृक्षरोपे पुरवीत असतात. त्यांच्या या पर्यावरण प्रेमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS