Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणपती उत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार

मुंबई ः कोकण आणि गणपती उत्सव एक अनोखे नाते आहे. याच गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्याची अनेकांना लगबग असते. मात्र यामुळे रेल्वे आणि बससेवा ठप्प होते

सेन्सॉर बोर्डाच्या नकारानंतर ’72 हुरेन’ चा ट्रेलर रिलीज
लवादाने ठोठावलेल्या दंडाप्रकरणी बीसीसीआयला उच्च न्यायालयाकडून दिलासा
लहान व्यवसायांमध्ये वाढीच्या शक्यतांसह गुंतवणूक 

मुंबई ः कोकण आणि गणपती उत्सव एक अनोखे नाते आहे. याच गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्याची अनेकांना लगबग असते. मात्र यामुळे रेल्वे आणि बससेवा ठप्प होते. त्यासाठी अखेर गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 2 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे.गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.

COMMENTS