Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी येथे छावा संघटनेचे अधिवेशन संपन्न 

नाशिक प्रतिनिधी  - शिर्डी येथे छावा क्रांतिवीर सेनेचे १० वे राष्ट्रीय महाअधिवेशन मा.दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, कै.अण्णासाहेब प

मिझोराममध्ये झेडपीएमचा एकहाती विजय
विद्यार्थी एक चांगले नागरिक म्हणून घडले पाहिजे : डॉ सुकेश झंवर
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार

नाशिक प्रतिनिधी  – शिर्डी येथे छावा क्रांतिवीर सेनेचे १० वे राष्ट्रीय महाअधिवेशन मा.दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष,कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले नरेंद्र अण्णासाहेब पाटील, मुंबई मित्र वृत्त समूह संपादक अभिजीत राणे, जनस्वराज्यसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजपा उद्योजक आघाडीचे प्रदीप पेशकर, ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा यांसह छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश,विभाग सर्व जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये भर पावसात शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या शाहिरी गजरात जल्लोषात अधिवेशन संपन्न झाले…

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की करण गायकर व छावा क्रांतिवीर सेना ही रस्त्यावर उतरून मराठा आरक्षण,शेतकरी,कामगार यांच्यासाठी लढणारी ज्वलंत संघटना म्हणून या महाराष्ट्राला परिचित आहे सर्वसामान्य घरातील ही मुलं गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात मी जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी हे समाजाचे व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरून ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्याबाबत आक्रमकपणे मी भूमिका घेऊन त्या सोडवून घेण्यासाठी कटिबद्ध आहे. करण गायकर आपण एवढे मोठ संघटन उभे केल आहे ते कोणाच्याही दावणीला नेऊन आता बांधू नका तुमची स्वतंत्र ताकद आहे ती ताकद समाजाच्या,गोर गरिबांच्या उत्कर्षासाठी वापरा. तुमच्या जिवाभावाचे कार्यकर्ते हीच तुमची ताकद आहे आणि आज तीच ताकद समोर दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण मला कुठेही बोलवा एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी मी सदैव उभा राहील असे मत व्यक्त केले.

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक घडविल्याबद्दल नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य नागरिक सत्कार यावेळी अधिवेशनात छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोपीय अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की छावा क्रांतिवीर सेना ही राज्यातील आक्रमक संघटना आहे,विविध जिल्ह्यांमध्ये या संघटनेची भरभक्कम कार्यकर्त्यांची फळी उभी आहे, आपण आज या व्यासपीठावरून जे ठराव मांडले आहे ते ठराव राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः पाठपुरावा करून आपली लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांसोबत एक बैठक घेवून सदर मागण्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. करण गायकर हे एक महाराष्ट्रातलं आक्रमक व उमदनेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही करण गायकारांवर विशेष असं प्रेम करतो आज मला अनेक ठिकाणी कार्यक्रम असताना फक्त या संघटनेच्या प्रेमापोटी मी एवढ्या लांब कार्यक्रमाला आलो.

या अधिवेशनासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश पदाधिकारी,विभागीय पदाधिकारी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख व कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार अहिल्यानगर जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री मस्के यांनी केले

COMMENTS