Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरातच राहणार

राहुरी प्रतिनिधी ः राहुरी शहरात असणारे ग्रामीण रुग्णालय शहरा बाहेर हलविण्यास राहुरी शहरवासी यांचा मोठा विरोध होता, यावर आमदार प्राजक्त तनपुरे यां

अहमदनगर : युनियन बॅंकेत 56 लाखांचा घोटाळा (Video)
रोटरी क्लब अकोले तीन पुरस्कारांनी सन्मानित
श्रीरामपुरात बिबट्याचा तरुणांवर हल्ला ….

राहुरी प्रतिनिधी ः राहुरी शहरात असणारे ग्रामीण रुग्णालय शहरा बाहेर हलविण्यास राहुरी शहरवासी यांचा मोठा विरोध होता, यावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आवाज उठवला होता. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानभेच्या अधिवेशनात राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उत्तरात दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे याविषयी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालय हे शहराबाहेर हलवले जाणार नाही असे मंत्रीमहोदयांनी आश्‍वासित केले होते. त्यानुसार सदर इमारत राहुरी शहरातच बांधण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक व आराखडे मागितले आहेत.
गेली कित्येक वर्षाच्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले आहे. पुढील प्रक्रिया देखील जलदगतीने पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी म्हटले आहे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे राहुरी शहर वासियांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अधिक लक्ष घालून याचा पाठपुरावा करावा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत नुकतेच राहुरीचे जिर्ण झालेले बस स्थानक पाडून या ठिकाणी नवीन बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होत आहे बस स्थानकाच्या कामामुळे प्रवाशांसह राहुरी शहर वासियांमध्ये समाधानाचे वातावरण असताना आता राहुरी शहरातच ग्रामीण रुग्णालय होणार असल्याने लवकर काम होणार असल्याची शाश्‍वती निर्माण झाली आहे.

COMMENTS